Rohit Sharma : एअर हॉस्टेसला पाहताच हिटमॅनने पोट घेतलं आत; फोटो होतोय व्हायरल

Rohit Sharma : सध्या हिटमॅन चांगलाच चर्चेत आहे. अनेकदा त्याला सोशल मीडियावरही ट्रोल केलं जातं. रोहितला पुन्हा एकदा त्याच्या वजनावरून ट्रोल करण्यात आलंय. 

सुरभि जगदीश | Updated: May 8, 2023, 11:57 PM IST
Rohit Sharma : एअर हॉस्टेसला पाहताच हिटमॅनने पोट घेतलं आत; फोटो होतोय व्हायरल title=

Rohit Sharma : टीम इंडिया ( Team India ) आणि मुंबई इंडियन्सचा ( Mumbai Indians ) कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma ) सध्या खराब फॉर्ममध्ये आहे. मुंबई इंडियन्सच्या ( Mumbai Indians ) सलग 2 सामन्यांमध्ये रोहित शर्मा शून्यावर आऊट झाला होता. यानंतर त्याच्यावर सोशल मीडियावर अनेक टीका करण्यात आल्या. अनेकदा रोहित शर्माला त्याच्या वजनावरून ( Rohit sharma weight ) देखील ट्रोल करण्यात येतं. अशातच रोहित शर्माचा ( Rohit Sharma ) आता एक फोटो व्हायरल होताना दिसतोय. या फोटोमध्ये रोहित शर्माने पोट आत घेतल्याचं दिसून येतंय. 

एअर हॉस्टेससोबत काढला हिटमॅनने फोटो

आजकाल अनेक गोष्टी व्हायरल होतायत. अशातच मुंबई इंडियन्सचा ( Mumbai Indians ) कर्णधार रोहित शर्माने एक एअर हॉस्टेससोबत फोटो काढला आहे. या फोटोमध्ये स्लिम आणि फीट दिसण्यासाठी पोट आत घेण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. रोहितचा ( Rohit sharma weight ) हाच फोटो व्हायरल झाला असून नेटकरी आता त्याला चांगलंच ट्रोल करतायत.

युझर्सकडून रोहित शर्मा ( Rohit sharma weight ) पुन्हा ट्रोल

खराब खेळीनंतर अनेकदा रोहितला त्याच्या वजनावरून ट्रोल करण्यात येतं. दरम्यान रोहितला ज्या फोटोमुळे ट्रोल केलं जातंय, त्याने तो नसता काढला तर बरं झालं असतं. सोशल मीडियावर ( social Media ) चाहते रोहितची फारच मजा घेतायत. 

आयपीएलमध्ये रोहितची बॅट चालेना!

गेल्या काही दिवसांपासून रोहित शर्मा खराब फॉर्मशी झुंज देताना दिसतोय. शनिवारच्या सामन्यात रोहित शर्मा ( Rohit Sharma ) सलग दुसऱ्यांदा शून्यावर बाद झाला होता. इतकंच नाही तर रोहित शर्मा ( Rohit Sharma ) आयपीएलमध्ये आतापर्यंत तब्बल 16 वेळा शून्यावर बाद झालाय. हा नवा रेकॉर्ड हिटमॅनने त्याच्या नावे केलाय.

आयपीएलमच्या 2023 च्या सिझनमध्ये रोहित शर्माची ( Rohit Sharma ) बॅट काही फारशी चाललेली नाही. रोहित शर्माला केवळ दिल्ली कॅपिटल्सविरूद्धच्या सामन्यात चांगला स्कोर करणं शक्य झालं होतं. दिल्लीविरूद्ध रोहितने ( Rohit Sharma ) 5 बॉल्समध्ये 65 रन्सची खेळी केली होती. त्यामुळे दुसरीकडे खराब फॉर्मवरून देखील रोहितला टीकांचा सामना करावा लागतोय.