Rohit Sharma Welcome To Shubman Gill In 200 Club: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरु आहे. पहिला सामना जिंकत भारताने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. पहिल्या सामन्यात भारताने 50 षटकात 349 धावा केल्या आणि 350 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. न्यूझीलंडने या धावांचा पाठलाग करताना भारतीय गोलंदाजांना घाम फोडला. न्यूझीलंडने हा सामना अवघ्या 12 धावांनी गमावला. न्यूझीलंडने 49.2 षटकात 337 धावांची खेळी केली. असं असताना या सामन्यात शुभमन गिलच्या द्विशतकी खेळीची चर्चा रंगली. शुभमन गिलनं 149 चेंडूत 208 धावांची खेळी केली. त्यामुळे सामनावीर म्हणून शुभमन गिलला गौरविण्यात आलं. या सामन्यानंतर द्विशतकी खेळी करणाऱ्या रोहित शर्मा, शुभमन गिल आणि इशान किशननं एकमेकांशी वार्तालाप केला. या दरम्यान रोहित शर्मानं इशान किशनची फिरकी घेतली. 200 धावा केल्यानंतर 3 सामने फेल गेल्याची आठवण करून दिली. त्यावर इशान किशननं आपल्या शैलीत उत्तर दिलं.
Rohit Sharma - Ishan, you scored a 200 and didn't play 3 matches.
Ishan Kishan - Rohit bhaiya, you're the captain pic.twitter.com/kmULRyRjzT
— Shubhankar Mishra (@shubhankrmishra) January 19, 2023
बातमी वाचा- IND vs NZ: हार्दिक पांड्या आऊट की नॉट आऊट तुम्हीच सांगा? पाहा Video
शुभमन गिलला वनडे सामन्यात 200 धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत स्थान मिळालं आहे. त्याने 149 चेंडूत 208 धावा केल्या. यात 19 चौकार आणि 9 षटकारांचा समावेश आहे. तर इशान किशननं 14 चेंडूत 5 धावा केल्या. त्यामुळे कर्णधार रोहित शर्माने त्याला दिलेला इशारा आहे, असं मत क्रीडाप्रेमी व्यक्त करत आहेत.