Sachin Tendulkar on Roger Federer : जगातील महान फलंदाजांपैकी एक, सचिन तेंडुलकर याला 'विक्रमांचा राजा' म्हटले जाते. आपल्या कारकिर्दीत क्रिकेटच्या मैदानावर चाहत्यांसाठी नेहमीच मोठी आशा असलेला सचिन टेनिसचाही चाहता आहे. महान टेनिसपटू रॉजर फेडरर याने गुरुवारी निवृत्तीची घोषणा केली तेव्हा सचिननेही त्याच्यासाठी एक भावनिक पोस्ट शेअर केली.
दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररने ( Roger Federer) व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती जाहीर केली आहे. स्वित्झर्लंडच्या 41 वर्षीय सुपरस्टारने गुरुवार, 15 सप्टेंबर रोजी सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट लिहिली आणि त्याच्या चाहत्यांना याबद्दल माहिती दिली. पुढील आठवड्यात लंडनमध्ये तो शेवटच्या वेळी लिव्हर कपमध्ये खेळताना दिसणार असल्याचे फेडररने सांगितले. फेडररने 20 ग्रँडस्लॅम जेतेपदे जिंकली.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतकांचा विक्रम करणाऱ्या सचिन तेंडुलकरने रॉजर फेडररच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्याने लिहिले, रॉजर फेडरर, काय करिअर आहे. आम्ही तुमच्या टेनिसच्या ब्रँडच्या प्रेमात पडलो. हळूहळू आपणामुळे टेनिसची सवय झाली आहे आणि सवयी कधीच संपत नाहीत, तो आपला एक भाग बनला आहे. अशा सर्व अद्भुत आठवणींबद्दल धन्यवाद.'
What a career, @rogerfederer. We fell in love with your brand of tennis. Slowly, your tennis became a habit. And habits never retire, they become a part of us.
Thank you for all the wonderful memories. pic.twitter.com/FFEFWGLxKR
— Sachin Tendulkar (@sachin_rt) September 15, 2022
या प्रवासात रॉजर फेडररने (Roger Federer) त्याचे चाहते आणि प्रतिस्पर्धी खेळाडूंचे आभार मानले आहेत. फेडरर म्हणाला की, वयाच्या 41 व्या वर्षी त्याला असे वाटते की खेळ सोडण्याची वेळ आली आहे. फेडररने आपल्या पोस्टमध्ये सांगितले की, तो 41 वर्षांचा आहे आणि त्याने 24 वर्षात 1500 हून अधिक सामने खेळले आहेत. करिअर ग्रँडस्लॅम पूर्ण करणाऱ्या मोजक्या खेळाडूंपैकी तो एक आहे.