वसीम अक्रमचा घातक बॉऊन्सर सचिनच्या हेल्मेटला लागला..तरीही सचिन शांत...दुसऱ्या बॉलला मैदानात जल्लोष

नवखा सचिन पाकिस्तानच्या वसीम अक्रमला अजून समजलेला नव्हता, तो दबाव टाकत होता, पण सचिनने न बोलता खेळातून जे उत्तर दिलं ते आजही दोन्ही टीम विसरलेल्या नाहीत.

Updated: May 12, 2021, 07:52 AM IST
वसीम अक्रमचा घातक बॉऊन्सर सचिनच्या हेल्मेटला लागला..तरीही सचिन शांत...दुसऱ्या बॉलला मैदानात जल्लोष  title=

मुंबई: बऱ्याचदा सामन्यादरम्यान गोलंदाजाचा घातक बाऊन्सर फलंदाजाला लागतो किंवा फलंदाज तो चुकवतोही त्यानंतर फलंदाजाची प्रतिक्रिया पाहण्यासारखी असते. क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने असे अनेक बाऊन्सर्स मैदानात अनुभवले आहेत. मात्र त्याने चेहऱ्यानं नाही तर आपल्या बॅटनं पुढच्या बॉलवर त्याची प्रतिक्रिया दिली आहे. असाच एक किस्सा गोलंदाज व्यंकटेश प्रसाद यांनी सांगितला आहे. 

90च्या दशकात भारत विरुद्ध पाकिस्तान शारजाह इथे खेळल्या गेलेल्या वन डे सामन्या दरम्यान असाच एक किस्सा घडला. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर क्रिझवर फलंदाजी करत होते. तर पाकिस्तानकडून वसीम अकरम गोलंदाजी करत होता. त्याने इतका घातकी आणि जबरदस्त बाउन्सर टाकला की तो थेट सचिनच्या हेल्मेटवर लागला. 

क्रिझवर असताना बॉलवर लक्ष

वसीमनं टाकलेला बाऊन्सर  सचिनच्या हेल्मेटला बॉल लागला होता. सचिननं त्यावेळी मैदानात कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. त्याने शांतपणे आपल्या खेळाकडे लक्ष केंद्रीत केलं. त्यांनी आपलं हेल्मेट काढून नीट केलं आणि पुन्हा खेळायला सुरुवात केली.

बाउन्सर बॉलचा असा घेतला बदला

बहरहाल प्रसाद यांनी सचिननं बाउन्सरचा बदला कसा घेतला हे सांगताना जबरदस्त किस्सा सांगितला आहे. अनेक खेळाडू स्लेज करून सचिनचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करायचे मात्र सचिनने आपलं लक्ष आणि मन दोन्ही पूर्णपणे खेळावर केंद्रीत केलं होतं. 

पुन्हा एकदा वसीमने तशाच पद्धतीनं घातक बाउन्सर टाकला होता. अगदी पहिल्यासारखा मात्र यावेळी सचिननं तो सोडला नाही तर असा टोलवला की मैदानातील सर्वजण हैराण झाले. त्याने या बाउन्सरवर थेट षटकार ठोकत पहिल्या बाउन्सरचा बदला घेतला होता. त्यानंतर मैदानात जल्लोष झाला. मात्र सचिनने त्यावरही कोणतीही प्रतिक्रिया न देता पुन्हा आपल्या खेळावर लक्ष केंद्रीत केलं.