VIDEO : शेन वॉर्न, मुरलीधरनचे रेकॉर्ड तुटणार, क्रिकेटचा देवही पडला त्याच्या बॉलिंगच्या प्रेमात

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने व्हिडिओ ट्विट करत या बॉलरचं कौतुक केलं आहे

Updated: Oct 15, 2021, 05:39 PM IST
VIDEO : शेन वॉर्न, मुरलीधरनचे रेकॉर्ड तुटणार, क्रिकेटचा देवही पडला त्याच्या बॉलिंगच्या प्रेमात  title=

विशाल सवने, झी मीडिया, मुंबई : भारताला गवसलाय एक असा बॉलर जो तोडू शकतो शेन वॉर्नचा रेकॉर्ड. ज्याच्या बॉलिंग आणि विकेट घेण्याची स्टाईल पाहिली तर मुरलीधरण देखील आवाक होईल. आहो इतकंच काय तर क्रिकेटचा देव असा बिरुद ज्याच्याकडं आहे तो मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर देखील त्याचा फॅन झाला आहे. 

सचिन तेंडुलकर त्याची तारीफ करताना थकत नाही. हा बॉलर जेव्हा जेव्हा बॉल टाकतोय लेग स्पिन करतोय तेव्हा तेव्हा प्रत्येक बॉलला तो समोरच्या बॅटसमनला चकवा देतोय. स्वत: सचिन तेंडुलकरनं याचा व्हिडीओ आपल्या ट्विटर हॅंडलवर शेअर केलाय. त्यामुळं आता भारतीय संघाची फिरकी गोलंदाजीची चिंता मिटली म्हणून समजा. मात्र हा भारतीय क्रिकेट संघात येण्यासाठी थोडा अवकाश आहे . 

कोण आहे हा बॉलर ? 

सचिन तेंडुलकर म्हणतो की हा व्हिडीओ मला एका मित्रानं पाठवला आहे. या व्हिडीओमध्ये त्याचं खेळाप्रती असलेलं प्रेम आणि पॅशन स्पष्ट दिसतेय. स्वत: सचिन या मुलाची तारीफ करताना थकत नाही, म्हणजेच या मुलाच्या खेळामध्ये कुछ तो बात होंगी हे नक्की आहे. 

हा मुलगा नेमका कोणत्या क्रिकेट  ऍकाडमिमध्ये खेळाचे धडे गिरवतो हे माहित नाही, मात्र या व्हिडीओमध्ये तो ज्या मैदानावर खेळतोय त्या मैदानात एक बंगाली भाषेत लिहलेली पाठी दिसतेय. यावरुन हा मुलगा पश्चिम बंगालचा असावा असा अंदाज फक्त आपण बांधू शकतो. 

अफगाणिस्तानचा बिनीचा स्पिनर राशिद खान याने देखील या पट्ट्याचं कौतुक केलंय. पण राशिद खान हा मुलगा जर अंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आला तर तुझे रेकॉर्ड तुटले म्हणून समज .