Sachin Tendulkar : अर्जुन सचिन तेंडुलकर याचे नशीब उघडले, भारताच्या या टीममध्ये संधी

Arjun Tendulkar : अर्जुन सचिन तेंडुलकर याला भारतीय क्रिकेटमध्ये (Cricket) प्रथमच प्रथम श्रेणी सामना खेळण्याची संधी मिळाली आहे. अर्जुन तेंडुलकर याची पहिल्यांदाच मुंबईच्या रणजी संघात निवड झाली आहे.  

Updated: Dec 30, 2021, 12:48 PM IST
Sachin Tendulkar : अर्जुन सचिन तेंडुलकर याचे नशीब उघडले, भारताच्या या टीममध्ये संधी title=
संग्रहित छाया

मुंबई : Cricket News : महान फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर  (Sachin Tendulkar) याचा मुलगा अर्जुन याचे नशीब उघडले आहे. अर्जुन तेंडुलकर ( Arjun Tendulkar) याला भारतीय क्रिकेटमध्ये (Cricket) प्रथमच प्रथम श्रेणी सामना खेळण्याची संधी मिळाली. अर्जुन तेंडुलकर याची पहिल्यांदाच मुंबईच्या रणजी संघात (Mumbai Ranji Trophy) निवड झाली आहे. सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर 13 जानेवारीला महाराष्ट्राविरुद्धच्या सामन्यातून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करू शकतो.

मुंबईच्या रणजी संघाची कमान सलामीवीर पृथ्वी शॉ याच्याकडे सोपवण्यात आली आहे. पहिल्या दोन सामन्यांमध्ये तो मुंबई क्रिकेट संघाचे नेतृत्व करणार आहे. मुंबई 41 वेळा रणजी चॅम्पियन आहे. अर्जुन तेंडुलकर हा वेगवान गोलंदाज असून तो अष्टपैलू खेळाडू आहे. फेब्रुवारी 2021 मध्ये झालेल्या आयपीएल लिलावात मुंबई इंडियन्सने अर्जुन तेंडुलकर याला 20 लाख रुपयांना विकत घेतले. एका हंगामानंतर, त्याला मुंबई इंडियन्सने सोडले. पुढील महिन्यात होणाऱ्या IPL 2022 च्या लिलावात अर्जुन तेंडुलकर याला पुन्हा एकदा विकत घेतले जाईल.

आता भारताच्या या संघात संधी  

मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) रणजी ट्रॉफीसाठी मुंबईचा संघ जाहीर केला असून त्याचा कर्णधार सलामीवीर पृथ्वी शॉ आहे. या 20 सदस्यीय संघात अर्जुन तेंडुलकर याचीही निवड झाली आहे. अर्जुन तेंडुलकर याला प्रथमच प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये संधी मिळणार आहे. मात्र, पहिल्या दोन सामन्यांसाठीच संघ जाहीर करण्यात आला आहे. मुंबईच्या संघाला 13 ते 16 जानेवारी दरम्यान महाराष्ट्राविरुद्ध आणि 20 ते 23 जानेवारी दरम्यान कोलकाता येथे दिल्लीविरुद्ध खेळायचे आहे.

20 जणांच्या संघात यांचीही निवड

याशिवाय यशस्वी जैस्वाल, सरफराज खान आणि अरमान जोहरी यांचाही 20 सदस्यीय संघात समावेश करण्यात आला आहे. याशिवाय आदित्य तरे यालाही मुंबईच्या संघात स्थान देण्यात आले आहे. भारतासाठी एक वनडे आणि 13 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा अष्टपैलू शिवम दुबे याचीही रणजी ट्रॉफीसाठी निवड झाली आहे. निवड समितीने अनुभवी वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णी याचीही निवड केली आहे.

मध्यमगती गोलंदाज मोहित अवस्थी, डावखुरा फिरकी गोलंदाज शम्स मुलाणी, ऑफस्पिनर शशांक अत्तर्डे आणि डावखुरा मध्यमगती गोलंदाज रॉयस्तान डायस यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडुलकर याचाही संघात समावेश करण्यात आला आहे. 41 वेळा रणजी चॅम्पियन मुंबईला एलिट नऊ संघांच्या क गटात ठेवण्यात आले असून ते 13 जानेवारीला महाराष्ट्राविरुद्धच्या सामन्याने आपल्या मोहिमेची सुरुवात करेल.

ही आहे संपूर्ण टीम -

पृथ्वी शॉ (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, ड्र्यू गोमेल, अरमान जाफर, सरफराज खान, सचिन यादव, आदित्य तरे (विकेटकीपर), हार्दिक तमोर (विकेटकीपर), शिवम दुबे, अमन खान, शम्स मुलानी, तनुष कोटियन, प्रशांत सोलंकी, शशांक अत्तर्डे , धवल कुलकर्णी, मोहित अवस्थी, प्रिन्स बदियानी, सिद्धार्थ राऊत, रॉयस्टन डायस आणि अर्जुन तेंडुलकर.