नवी दिल्ली : राहुल द्रविडचा मुलगा समित द्रविडनं आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत क्रिकेटचं मैदान गाजवायला सुरुवात केलीय. त्यानं राज्यस्तरीय शालेय स्पर्धेत शतक झळकावण्याची किमया साधली.
१४ वर्षाखालील स्पर्धेत त्यानं मल्या आदिती इंटरनॅशनल प्रशालेकडून खेळता १५० धावा केल्या.
त्याच्या या दिडशतकी खेळीमुळे समितच्या संघाला विवेकानंद प्रशालेवर ४१२ धावांनी विजय साकारता आला.
समितबरोबर भारताचा माजी फिरकीपटू सुनिल जोशीचा मुलगा आर्यननंही १५४ धावांची खेळी केली.
या दोघांच्या भागीदारीमुळेच त्यांच्या संघाला ५० षटकांमध्ये ५ बाद ५०० धावांचा डोंगर रचता आला.
द्रविडप्रमाणेच आता त्याचा मुलगा समितीनं क्रिकेटच्या मैदानावर आपली वेगळी ओळख निर्माण करायला सुरुवात केलीय.