T20 WORLD CUP : 'या' खेळाडूला यूएईतच थांबण्याचे आदेश, टीम इंडियात मिळू शकते संधी

टीम इंडियातील काही खेळाडू जखमी आहेत तर काही खेळाडूंना खराब फॉर्मचा सामना करावा लागत आहे

Updated: Oct 12, 2021, 10:37 PM IST
T20 WORLD CUP : 'या' खेळाडूला यूएईतच थांबण्याचे आदेश, टीम इंडियात मिळू शकते संधी title=

मुंबई : टी20 विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेला येत्या 17 ऑक्टोबरपासून यूएईमध्ये (UAE) सुरुवात होणार आहे. 15 ऑक्टोबरला आयपीएलचा (IPL 2021) अंतिम सामना रंगणार आहे. त्यानंतर लगेचच विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वाखाली टीम इंडियाचं (Team India) 'मिशन टी20 विश्वचषक' सुरु होईल. भारताचा पहिला सामना 24 ऑक्टोबरला पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. त्याआधी टीम इंडिया दोन सराव सामने खेळणार आहे. 

टी20 विश्वचषक स्पर्धेसाठी 15 खेळाडूंच्या भारतीय संघाची (Team India Squad) निवड करण्यात आली आहे. पण या संघात काही बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण निवड करण्यात आलेल्या संघाताली काही खेळाडू जखमी आहेत तर काही खेळाडूंना खराब फॉर्मचा सामना करावा लागत आहे. अशात आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची वर्णी लागू शकते असं बोललं जात आहे.

संजू सॅमसनला लागणार लॉटरी?

राजस्थान रॉयल संघाचा कर्णधार संजू सॅमसनला (Sanju Samson) टीम इंडियात संधी मिळू शकते. पुढची सूचना मिळेपर्यंत यूएईमध्ये थांबण्याचे आदेश संजू सॅमसनला देण्यात आले आहेत. संजू सॅमसनची राजस्थान रॉयल (Rajstan Royal) 7 ऑक्टोबरलाच आयपीएलमधून बाहेर गेली आहे.

आयपीएलच्या चौदाव्या हंगामातील दुसऱ्या टप्प्यात सॅमसनने सात मॅचमध्ये 207 धावा केल्या आहेत. यात 82 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. याशिवाय विकेटकिपर असण्याचाही त्याला फायदा होणार आहे.

आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि राहुल चहर (Rahul Chahar) या खेळाडूंची कामगिरी सुमार झाली आहे. त्यामुळे त्यांच्या जागी इतर खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता आहे.

टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया  

विराट कोहली(कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जाडेजा, राहुल चाहर, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी.

राखीव खेळाडू :  श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर आणि दीपक चाहर 

वर्ल्ड कपमधील टीम इंडियाचे सामने

पाकिस्तान (24 ऑक्टोबर)

न्यूझीलंड (31 ऑक्टोबर)

अफगाणिस्तान (3 नोव्हेंबर)

ग्रुप स्टेजमधील क्वालिफाय टीम 1 (5 नोव्हेंबर)

ग्रुप स्टेजमधील क्वालिफाय टीम 2 (8 नोव्हेंबर)

टीम इंडियाचा पहिला सामना केव्हा?

टीम इंडियाचा या टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिला सामना हा पारंपरिक प्रतिस्पर्धी असेलेल्या पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. हा सामना 24 ऑक्टोबरला खेळवला जाणार आहे. या हायव्होल्टेज सामन्यासाठी दोन्ही देशातील चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.

दुबई आणि ओमानमध्ये आयोजन

टी20 विश्वचषक स्पर्धेचं आयोजन हे दुबई आणि ओमानमध्ये करण्यात आलं आहे. या स्पर्धेला 17 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. तर फायनल मॅच 14 नोव्हेंबरला पार पडणार आहे. स्पर्धेतील सर्व सामने हे ओमान, अबुधाबी, दुबई आणि शारजाह इथं खेळवण्यात येणार आहेत.