सेहवागने अजब-गजब डान्स शेअर करत क्रिस गेलला दिले हे नवे नाव

भारताचा माजी विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग हा सोशल मीडियावरही शाब्दिक फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह राहणारा सेहवाग अनेकदा मजेदार ट्वीट करतो. सेहवाग आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबमध्ये मेंटोरही आहे, यंदाच्या आयपीएलला ८ मार्चपासून सुरुवात होतेय. मुंबई आणि चेन्नई यांच्यात पहिला सामना रंगणार आहे. दोन वर्षांच्या बंदीनंतर चेन्नई आयपीएलमध्ये परततेय. 

Updated: Apr 2, 2018, 04:32 PM IST
सेहवागने अजब-गजब डान्स शेअर करत क्रिस गेलला दिले हे नवे नाव title=

मुंबई : भारताचा माजी विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग हा सोशल मीडियावरही शाब्दिक फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह राहणारा सेहवाग अनेकदा मजेदार ट्वीट करतो. सेहवाग आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबमध्ये मेंटोरही आहे, यंदाच्या आयपीएलला ८ मार्चपासून सुरुवात होतेय. मुंबई आणि चेन्नई यांच्यात पहिला सामना रंगणार आहे. दोन वर्षांच्या बंदीनंतर चेन्नई आयपीएलमध्ये परततेय. 

आयपीएलसाठी अनेक विदेशी खेळाडू भारतात येऊ लागलेत. क्रिस गेलही भारतात येणार आहे. नुकताच क्रिस गेलने व्हिडीओ शेअऱ करताना याची माहिती दिलीये. या व्हिडीओत क्रिस गेल पंजाबी गाण्यावर भांगडा करतोय. क्रिस गेलच्या चेहऱ्यावरुनच तो किती खुश आहे हे दिसतोय. 

वीरेंद्र सेहवागही गेलला संघात घेऊन खुश आहे. लिलावानंतर सेहवागने क्रिस गेलबद्दल म्हटले होते की तो संघासाठी ट्रम्प कार्ड सिद्ध होऊ शकतो. आता सेहवागने क्रिस गेलला पूर्णच पंजाबी बनवलेय. 

सेहवागने गेलला पंजाबी नाव दिलेय. सेहवागने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन एक व्हिडीओ ट्वीट केलाय. या व्हिडीओत सेहवागने गेलला ट्विट केलेय आणि गेलला @henrygayle उर्फ क्रिसनप्रीत गिल... असं म्हटलंय. 

याला क्रिस गेलने रिप्लाय केलाय. त्याने LOL असं लिहिलंय. 

किंग्स XI पंजाब टीम

युवराज सिंग क्रिस गेल, आरोन फिंच, अक्षर पटेल, केएल राहुल, अँड्रयू टाई, डेविड मिलर, मार्कस स्टोयनिस, करुण नायर, मयंक अग्रवाल, मनोज तिवारी, अक्षदीप नाथ, रविचन्द्रन अश्विन, मोहित शर्मा, बरिंदर सरान, मुजीब ज़दरण, बेन ड्वौर्शुइस, अंकित राजपूत, मयंक डागर, प्रदीप साहू, मंजूर अहमद डार.