सततच्या डोपिंग चाचणीमुळे सेरेना नाराज, म्हणाली 'हा तर भेदभाव'

२३वेळा ग्रॅँडस्लॅम जिंकलेल्या सेरेनाने एक ट्विट करून पुन्हा एकदा ही चर्चा सुरू केली आहे.

Updated: Jul 28, 2018, 01:52 PM IST
सततच्या डोपिंग चाचणीमुळे सेरेना नाराज, म्हणाली 'हा तर भेदभाव' title=

पॅरिस: टेनिसपटू सेरेना विल्यम्सने अमेरिकेच्या डोपिंग प्रमुखांवर भेदभाव केल्याचा आरोप करत इतर खेळाडूंपेक्षा माझीच डोपिंग चाचणी जास्त वेळा करण्यात आल्याचे म्हटले आहे.  २३वेळा ग्रॅँडस्लॅम जिंकलेल्या सेरेनाने एक ट्विट करून पुन्हा एकदा ही चर्चा सुरू केली आहे. तिने आपल्या अधिकृत ट्विटर पेजवर लिहिले आहे, 'ही एक डोपींग चाचणीची वेळ आहे आणि तिसुद्धा फक्त सेरेनासाठी. आता तर हेही सिद्ध झाले आहे की, सर्व खेळाडूंपेक्षा माझीच चाचणी अधिक वेळा झाली आहे'. हा भेदभाव असल्याचा आरोप करतच सेरेना पुढे म्हणते, 'मला वाटते की, कमीत कमी मी माझा खेळ तर चांगला खेळते आहे'. 

दरम्यान, विम्बल्डनमध्ये सेरेनाने चाचणी केल्या जाणाऱ्या यंत्रणांकडून सर्वाधिक आपलीच चाचणी केल्याचे म्हटले होते. जूनमध्येही तिने या अघोषीत चाचणीबाबत नाराजी व्यक्त केली होती. कारण, फ्लोरिडा येथील तिच्या घरी हे चाचणी अनेक वेळा करण्यात आली. सेरेनाने केलेल्या दाव्यानुसार जूनमध्ये सेरेनाचे सुमारे पाच वेळा चाचणी करण्यात आली. पण, काही खेळाडूंची तर आतापर्यंत एकदाही चाचणी केली नसल्याचे तिने म्हटले आहे.

सेरेना विल्यम्स पुढच्या आठवड्यात कॅलिफोर्नियाच्या सेन जोस येथे मुबादाला सिलिकॉन व्हॅली क्लासिकमध्ये भाग घेईल. त्यानंतर ती पुढच्या महिन्यात हाणाऱ्या मॅट्रीयलमध्ये रॉजर्स चषकातही खेळणार आहे. २३ वेळा ग्रँडस्लॅम विजेती सेरेना ३० जुलै ते ५ ऑगस्ट पर्यंत सिलिकॉन व्हॅली क्लिसकमध्ये खेळेन. ज्याचे आयोजन पहिल्यांदाच सेन जोस स्टेट यूनिव्हर्सिटीमध्ये करण्यात आले आहे.