WWE: जॉन सिना विरूद्ध अंडरटेकर; SummerSlamमध्ये रंगणार सामना?

रेसलिंगच्या जाणकारांनी व्यक्त केलेल्या मतानुसार, WWE बॅकस्टेज SummerSlamमध्ये हा सामना होणार असल्यावर जोरदार चर्चा सुरू आहे.

Updated: Jul 28, 2018, 01:06 PM IST
WWE: जॉन सिना विरूद्ध अंडरटेकर; SummerSlamमध्ये रंगणार सामना?

नवी दिल्ली: WWEचा सर्वात खास इव्हेंट समरस्लॅम (SummerSlam)१९ ऑगस्ट (भारतात २० ऑगस्ट) सुरू होत आहे. या इव्हेंटबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. हा इव्हेंट आणखी रंगतदार बनविण्यासाठी WWE जॉन सिना आणि अंडरटेकर यांचा सामना पीपीव्हीमध्ये बुक करण्याची शक्यता आहे. दरम्यान, जॉन सिनाने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात एक हात कबरीतून बाहेर येताना दिसत आहे. हा फोटो पाहून तर्क लावण्यात येत आहे की, SummerSlamमध्ये जॉन सिना विरूद्ध अंडरटेकर असा सामना रंगू शकतो.

दरम्यान, रेसलिंगच्या जाणकारांनी व्यक्त केलेल्या मतानुसार, WWE बॅकस्टेज SummerSlamमध्ये हा सामना होणार असल्यावर जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, सिना आणि अंडरटेकर यांच्यातील छोटा बिल्डअप कंपनी पुन्हा एकदा पाहू इच्छित नाही. पण, SummerSlamमध्ये कंपनी पुन्हा एकदा अनेक धक्कादायक गोष्टी घेऊन येऊ शकते. रेसलमेनिया ३४मध्ये सिना आणि टेकरचा एक शानदार सामना ठेवण्यात आला होता. रेसलमेनियापूर्वी सुमारे एक महिना सिना वारंवार अंडरटेकरला उचकवत होता. पण, अंडरडेकर थेट ग्रँड स्टेजवरच आला आणि त्याने सिनाला उत्तर दिले. त्यानंतरच मुख्य सामना सुरू झाला.

PunjabKesari

सिना आणि अंडरटेकर यांच्यातील सामना हा रेसलमेनियातील सर्वोत्तम सामना म्हणून ओळखला गेला. दरम्यान, सिना आणि अंडरटेकरचा सामना जेव्हा सुरू झाला तेव्हा कोणीही साधा अंदाजही व्यक्त केला नव्हता की, १६ वेळा माजी चॅम्पीयन ठरलेला रेसलर केवळ ३ मिनिटांच्या आतच अंडरटेकरकडून पराभूत होईल. दरम्यान, सिना सध्या हॉलिवूडमधील करिअरमध्ये व्यस्त आहे. तर, अंडरटेकरला मेडिसन स्क्वॉयर गार्डमध्ये खेळताना चाहत्यांनी पाहिले होते.