Shaheen Shah Afridi took 100 wickets in ODI : यंदा भारतात होत असणाऱ्या आयसीसी वर्ल्ड कप मध्ये आता रंगत चढू लागली आहे. सर्व संघ टॉप 4 मध्ये जागा मिळवण्यासाठी धडपड करत आहेत. सोबतच यावर्षी अनेक विक्रमांची नोंदही खेळाडूंकडुन केली जात आहे.
बांग्लादेश विरुद्ध पाकिस्तान मधील सामन्यात पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीकडून एका विक्रम मोडीत काढण्यात आला आहे. कोलकत्त्याच्या ईडन गार्डन्स येथे झालेल्या या सामन्यात बांग्लादेशने टॉस जिंकून आधी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण कर्णधार शाकीब अल हसनचा हा निर्णय पाकिस्तानच्या पथ्यावर पडला. सुरुवातीपासूनच बांग्लादेशचे फलंदाज काही खास खेळी न दाखवता पव्हीलियनमध्ये परतले.
यादरम्यान पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी याने एक अनोखा विक्रम आपल्या नावे केला. आफ्रिदीने त्याच्या 51 व्या वनडे मॅच मध्ये सर्वात जलद 100 विकेट घेणारा वेगवान गोलंदाज बनला.सोबतच 100 विकेट्सचा टप्पा गाठणारा तिसरा गोलंदाजही तो बनला.ओपनिंग ओवरच्या सुरुवातीच्या 4 चेंडूंवर बांग्लादेशी फलंदाज तंजीद हसन एकही धाव घेऊ शकला नाही आणि ओवरच्या 5 व्या चेंडूवर आफ्रिदीने त्याला LBW केले. अशा रीतीने तंजीद ची विकेट, शाहीन शाह आफ्रिदीची वनडे क्रिकेटमधली 100 वी विकेट ठरली .
त्याने वनडे क्रिकेटच्या इतिहासात सर्वात वेगवान 100 विकेट घेतल्या. अवघ्या 51 मॅचेस मध्ये त्याने ही कमाल करून दाखवली. याआधी हा विक्रम ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कच्या नावे होता. स्टार्कने 52 मॅचेस मध्ये विकेट्सच्या शतकांचा विक्रम रचला होता. त्यानंतर न्युझीलंडचा शेन बॉन्ड आणि बांग्लादेशचा मुस्तफिजुर रहमानने 54 मॅचेस मध्ये विकेट्सच्या शतकांचा हा टप्पा गाठला होता.
हेसुद्धा वाचा : 'हे काय झालंय', मुंबईतील प्रदूषणावर रोहित शर्माची पोस्ट, शेअर केला विमानातील फोटो
नेपाळी स्पिनर संदीप लामिछाने हा सर्वात वेगवान 100 विकेट्स घेणारा खेळाडू आहे. संदीपने 42 मॅचेसमध्ये हा विक्रम प्रस्थापित केला आहे. तोच अफगाणी गोलंदाज राशीद खानने 44 मॅचेस मध्ये ही कमाल करून दाखवली.