शाहीद अफरीदीची मुलगी अडकणार लग्नाच्या बेडीत, या क्रिकेटरसोबत ठरला विवाह

पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद अफरीदीची मोठी मुलगी तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत आली होती. 

Updated: May 23, 2021, 09:55 AM IST
शाहीद अफरीदीची मुलगी अडकणार लग्नाच्या बेडीत, या क्रिकेटरसोबत ठरला विवाह title=

मुंबई: पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद अफरीदीची मोठी मुलगी तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत आली. ही मुलगी लग्नाचा बेडीत अडकणार आहे. शाहिद अफरीदीने यासंदर्भात खुलासा केला आहे. शाहिद अफरीदी आणि क्रिकेटपटू रिलेशनमध्ये काही दिवसांपासून असल्याच्या चर्चांना देखील सोशल मीडियावर उधाण आलं होतं त्या चर्चांनाही फेटाळून लावत आता त्याने मोठा खुलासा केला आहे. 

शाहिद अफरीदीच्या मोठ्या मुलीचा विवाह वेगवान गोलंदाज शाहीन शाह अफरीदीसोबत होणार आहे. शाहीन आणि अक्शा आधीपासून रिलेशनशिपमध्ये नव्हते असाही खुलासा शाहिद अफरीदीने केला आहे. शाहीन आणि अक्शा आपल्या करियरवर सध्या फोकस करत आहे. 

अक्शाचा जन्म 15 डिसेंबर 2001 रोजी झाला होता. अक्शा तिच्या सौंदर्यामुळे सोशल मीडियावर बरीच चर्चेत आली. शाहिद अफरीदी आपल्या मुलींना प्रसिद्धीपासून दूर ठेवतो. मात्र, पाकिस्तान सुपर लीग सामन्यात शाहिद अफरीदीच्या मुली स्टेडियममध्ये बर्‍याच वेळा दिसल्या होत्या. शाहिदला पाच मुली आहेत. सर्वात मोठी अक्शा, असमारा, अंशा, अज्‍वा आणि अरवा अशी त्यांची नावं आहेत. अक्शा ही सर्वात मोठी मुलगी आहे. 

शाहिन अफरीदीने 2018 मध्ये पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. शाहीन देशासाठी तिन्ही स्वरूपात खेळत आहे. शाहिन अफरीदीने पाकिस्तानकडून आतापर्यंत 15 कसोटी, 22 वन डे आणि 21 टी -20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.