मुंबई: रोड सेफ्टी सीरिजनंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. सचिनने स्वत:ला होम क्वारंटाइन केलं आहे. तर संपर्कात आलेल्या सर्वांना कोरोना चाचणी करण्याचं आवाहन केलं आहे. तर सचिन लवकर बरा व्हावा यासाठी सर्व स्तरातून चाहते प्रार्थना करत आहेत. पाकिस्तानचा पूर्व वेगवान गोलंदाज शोएब अख्तरनं ट्वीट करून सचिनला लवकर बरं होण्यासाठी प्रार्थना केली आहे.
शोएब अख्तरनं केलेल्या ट्वीटची सर्वत्र चर्चा होत आहे. मैदानावर शोएब आणि सचिन तेंडुलकर यांच्यातलं प्रतिद्वंद्व संपूर्ण जगानं पाहिलं आहे. मात्र प्रत्यक्षात दोघंही खूप चांगले मित्र आहेत. शोएब अख्तरला जशी सचिनचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळाली त्यांनी ट्वीट करून लवकर बरं होण्याची प्रार्थना करत शुभेच्छा दिल्या आहेत.
One of my favorite rivalries on the ground. Get well soon buddy @sachin_rt pic.twitter.com/mAleuepcwM
— Shoaib Akhtar (@shoaib100mph) March 30, 2021
शोएबने जुना फोटो ट्वीट करून माझा आवडता मैदानातील शत्रू लवकर बरा हो! असं म्हणत प्रार्थना केली आहे. शोएबनं केलेल्या या ट्वीटची सर्वत्र चर्चा होत आहे. शोएब आणि सचिन तेंडुलकर अनेक सामने आमने-सामने खेळले आहेत. शोएब अख्तरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 444 विकेट्स घेण्याचा विक्रम केला आहे. त्याने वन डे सामन्यात 5 तर कसोटीमध्ये 3 वेळा सचिनला आऊट केलं आहे.