मुंबई: भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झाची पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकने माफी मागितली आहे. त्याने माफी मागितल्यानंतर सोशल मीडियावर दोघांचीही चर्चा होत आहे. 12 एप्रिल रोजी दोघांच्याही लग्नाला 11 वर्ष पूर्ण झाली. त्यानंतर त्याने कोणत्या कारणावरून माफी मागितली याची चर्चा होत आहे.
शोएबनं सानियाची माफी मागत सानियाला लग्नाच्या वाढदिवसाचं विश केलं. शोएब लग्नाचा वाढदिवस विसल्यानं त्याने सानियाची माफी मागितली. आपली चूक सुधारत त्याने मजेशीर ट्वीट केलं आहे. या ट्वीटनंतर सोशल मीडियावर दोघंही चर्चेत आले आहेत.
Oops ghalti se mistake hogaya
Wishing you a day late as always, love you @MirzaSania to the moon and back begum Bay-Ghum
— Shoaib Malik (@realshoaibmalik) April 13, 2021
चुकून चूक झाली. दरवेळीप्रमाणे यावेळीही एक दिवस उशिरा तुला शुभेच्छा देत आहे. खूप सारं प्रेम असं म्हणत शोएबनं ट्वीट केलं आहे. तर सानियानं दोघांचा फोटो इन्स्टावर शेअर करत शोएबला शुभेच्छा दिल्या होत्या.