भारताचं दक्षिण आफ्रिकेसमोर २७५ रन्सचं आव्हान

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाचव्या वनडेमध्ये भारतानं ५० ओव्हरमध्ये २७४/७ एवढा स्कोअर केला आहे.

Updated: Feb 13, 2018, 08:26 PM IST
भारताचं दक्षिण आफ्रिकेसमोर २७५ रन्सचं आव्हान title=

पोर्ट एलिजाबेथ : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाचव्या वनडेमध्ये भारतानं ५० ओव्हरमध्ये २७४/७ एवढा स्कोअर केला आहे. रोहित शर्मानं झळकवालेल्या शतकामुळे भारताला या स्कोअर पर्यंत मजल मारता आली. वनडे क्रिकेटमधलं रोहितचं हे १७वं शतक आहे. तर दक्षिण आफ्रिकेमधलं रोहितचं हे पहिलंच शतक आहे. याआधी दक्षिण आफ्रिकेमध्ये रोहितचा सर्वाधिक स्कोअर २३ रन्स होता.

या मॅचमध्ये टॉस जिंकून दक्षिण आफ्रिकेनं पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. रोहित आणि शिखर धवननं भारताला चांगली सुरुवात करुन दिली. पण शिखर धवन २३ बॉल्समध्ये ३४ रन्स करुन आऊट झाला. यानंतर रोहितनं विराटच्या मदतीनं भारताचा डाव सावरायला सुरुवात केली. पण विराट कोहली ३६ रन्सवर असताना रन आऊट झाला. यानंतर बॅटिंगला आलेला अजिंक्य रहाणेही ८ रन्सवर रन आऊट झाला. अजिंक्य रहाणेनंतर बॅटिंगला आलेल्या श्रेयस अय्यरनं ३७ बॉल्समध्ये ३० रन्स केले. तर हार्दिक पांड्या पहिल्या बॉलला आऊट झाला. दक्षिण आफ्रिकेच्या एनगिडीनं ४ तर रबाडानं एक विकेट घेतली.

६ मॅचच्या वनडे सीरिजमध्ये भारत ३-१नं आघाडीवर आहे. डरबनमध्ये झालेली पहिली वनडे भारतानं ६ विकेटनं, सेंच्युरिअनमध्ये झालेली दुसरी वनडे ९ विकेटनी आणि केप टाऊनमध्ये झालेली तिसरी वनडे १२४ रन्सनी जिंकली. पाचव्या वनडेमध्ये दक्षिण आफ्रिकेचा ५ विकेटनी विजय झाला. ही मॅच भारत जिंकला तर तब्बल २६ वर्षानंतर दक्षिण आफ्रिकेत भारत वनडे सीरिज जिंकेल. याआधी एकदाही भारताला दक्षिण आफ्रिकेत वनडे सीरिज जिंकता आलेली नाही. 

लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा