IND vs SA Test Series | टीम इंडिया केपटाऊनमध्ये पराभवाची मालिका खंडित करत सीरिज जिंकणार का?

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात 11 जानेवारीला तिसरा कसोटी सामना (India vs South Africa Test Series) खेळवण्यात येणार आहे. 

Updated: Jan 9, 2022, 07:29 PM IST
IND vs SA Test Series | टीम इंडिया केपटाऊनमध्ये पराभवाची मालिका खंडित करत सीरिज जिंकणार का?  title=

केपटाऊन : टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात 11 जानेवारीला तिसरा कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. हा सामना केपटाऊनमध्ये खेळवण्यात येणार आहे. ही 3 सामन्यांची कसोटी मालिका 1-1 ने बरोबरीत आहे.  टीम इंडियाला आतापर्यंत एकदाही केपटाऊनमध्ये कसोटी सामना जिंकता आलेला नाही. तसेच टेस्ट सीरिजही जिंकता आलेली नाही. त्यामुळे विराटसेनेला हा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याची सुवर्णसंधी आहे. (south africa vs team india has chance to win 3rd test match and win to maiden series in africa at newlands cape town)  

टीम इंडियाची केपटाऊनमधील कामगिरी

टीम इंडियाने 1993 पासून आतापर्यंत  केपटाऊनमध्ये एकूण 5 कसोटी सामने खेळले आहेत. टीम इंडियाला यापैकी 3 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर 2 सामने अनिर्णित राखण्यात यश आलं आहे. 

टीम इंडियाला आफ्रिका विरुद्धच्या दुसरा कसोटी सामना जिंकून 28 वर्षांनंतर मालिका जिंकण्याची संधी चालून आली होती. मात्र दुसऱ्या सामन्यात आफ्रकिने भारताचा 7 विकेट्सने पराभव करत मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली.

विराटसेनेचा दुसऱ्या सामन्यात पराभव झाला. या पराभवामुळे टीम इंडियाचा आफ्रिकेतील कसोटी मालिका विजयाचं स्वप्न लांबलं. मात्र हा कारनामा करण्याची संधी टीम इंडियाला अजूनही आहे. त्यामुळे टीम इंडियाला तिसरा सामना जिंकत किर्तीमान रचण्याची संधी आहे. यामुळे विराटसेना हा कारनामा करणार का, याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे.