स्टंट करण्याच्या नादात बॉडीबिल्डरने गमावला जीव (व्हिडिओ)

दक्षिण  आफ्रिकेचा बॉडीबिल्डिंग चॅम्पियन सिफिसो लुंगेलो थाबेथेची बॅकफ्लिप करताना अगदी वाईट पद्धतीने जमिनीवर आदळला. बॅकफ्लिप करण्याच्या प्रयत्नात त्याची मान तुटली आणि तिथेच त्याने आपले प्राण सोडले. ही घटना शनिवारची आहे. जिथे बॉडी बिल्डर सिफिसो एक जिम्नॅशियमध्ये पोहोचले. आणि त्यावेळी त्यांना चिअरअप करत होते. तेव्हा सिफिसो लोकांना अभिवादन करत मसल्स दाखवत बॅकफिल्प करत होता. आणि तेव्हाच

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Aug 14, 2017, 03:44 PM IST
स्टंट करण्याच्या नादात बॉडीबिल्डरने गमावला जीव (व्हिडिओ)

नवी दिल्ली : दक्षिण  आफ्रिकेचा बॉडीबिल्डिंग चॅम्पियन सिफिसो लुंगेलो थाबेथेची बॅकफ्लिप करताना अगदी वाईट पद्धतीने जमिनीवर आदळला. बॅकफ्लिप करण्याच्या प्रयत्नात त्याची मान तुटली आणि तिथेच त्याने आपले प्राण सोडले. ही घटना शनिवारची आहे. जिथे बॉडी बिल्डर सिफिसो एक जिम्नॅशियमध्ये पोहोचले. आणि त्यावेळी त्यांना चिअरअप करत होते. तेव्हा सिफिसो लोकांना अभिवादन करत मसल्स दाखवत बॅकफिल्प करत होता. आणि तेव्हाच

बॅकफ्लिपची या घटनेचा व्हिडिओ ऑनलाइन रेकॉर्ड झाला. आणि आता तो व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की २३ वर्षीय सिफिसो हवेत ब्लॅकफ्लिप करताना मानेवर अगदी वाईट पद्धतीने पडले आणि या घटनेत त्यांची मान तुटली. त्यावेळी कोणतीच हालचाल होत नसल्यामुळे तेथील उपस्थित लोकांनी धावत घेतली. तेव्हा घडलेला प्रकार लक्षात आला. आणि लगेचच त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र तेव्हा त्याला मृत घोषित करण्यात आलं. 

या घटनेनंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला. एका २३ वर्षीय तरूण बॉडीबिल्डरची अशी दयनीय अवस्था सगळ्यांसाठीच धक्कादायक होती. हा प्रशिक्षण घेतलेला बॉडीबिल्डर असूनही ही त्याची अवस्था आहे. तर सामान्यांनी असा प्रकार करताना अनेकदा विचार करा.