मोहाली : भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आज त्याचा 100वा टेस्ट सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. नवा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी करण्यासाठी टीम उतरली आहे. यापूर्वी मैदानावर विराट कोहलीसाठी खास सेरेमनी झाली. यावेळी टीम इंडियाचे कोच राहुल द्रविड यांनी विराट कोहलीला टेस्ट कॅप देऊन सन्मान केला. यावेळी विराटची पत्नी अनुष्का देखील त्याच्या सोबत होती.
विराटला हा स्पेशल मेमेंटो देण्यापूर्वी टीमचे कोच राहुल द्रविड म्हणाणले, तू हा पल्ला गाठलास यासाठी तुला आणि तुझ्या कुटुंबाला फार शुभेच्छा. तू फार मेहनतीने इथपर्यंत पोहोचला आहेस.
यावेळी विराट द्रविडचे आभार मानून म्हणाला, धन्यवाद राहुल भाई, हा माझ्यासाठी एक विशेष क्षण आहे. माझी पत्नीही माझ्यासोबत आहे. माझ्या भाऊ आणि कुटुंब, लहानपणीचे कोचही उपस्थित आहेत. सर्वांना गर्व आहे. माझ्या सोबत खेळणाऱ्या खेळाडूंचंही आभार, त्यांनी मला खूप मदत केली.
विराट म्हणाला, हा एक टीम गेम आहे आणि तुमच्या मदतीशिवाय हे पूर्ण होणं अशक्य आहे. मी बीसीसीआयचे आभार मानतो, त्यांनी मला देशाचं प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिली.
भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने आज एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. श्रीलंकेविरूद्धची पहिली विराट कोहलीसाठी त्याच्या कारकिर्दीतील 100 टेस्ट मॅच आहे. भारताकडून 100 टेस्ट सामने खेळणारा विराट 12 खेळाडू आहे.