भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने आज एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. श्रीलंकेविरूद्धची पहिली विराट कोहलीसाठी त्याच्या कारकिर्दीतील 100 टेस्ट मॅच आहे. भारताकडून 100 टेस्ट सामने खेळणारा विराट 12 खेळाडू आहे. दरम्यान बीसीसीआयने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये अनेक दिग्गजांनी विराटला शुभेच्छा दिल्या आहेत.
विराट कोहली हा दिल्लीचा रहिवासी आहे. विरेंद्र सेहवाग देखील दिल्लीचा खेळाडू असून त्याने देखील भारतासाठी 100 सामने खेळले आहेत. दरम्यान दिल्लीकडून 100 सामने खेळणारा विराट हा तिसरा फलंदाज आहे. यासाठी सेहवागने विराटला खास पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत.
विराटला शुभेच्छा देताना विरेंद्र सेहवाग म्हणाला, हाजमे की गोली, त्योहार में होली आणि बैटिंग में कोहली, संपूर्ण देशाच्या आवडीचं आहे. त्याने त्याचा फिटनेस राखत चांगलं करियर केलं आहे. त्याचसोबत भारताला अनेक विजयही मिळवून दिलेत. त्याच्या या कामगिरीबद्दल त्याला खूप शुभेच्छा.
#TeamIndia great @virendersehwag in his own unique style wishes @imVkohli on his th Test. #VK100 pic.twitter.com/CutphkT7ba
— BCCI (@BCCI) March 3, 2022
यापूर्वी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने देखील विराटला शुभेच्छा दिल्या होत्या. यावेळी सचिनने विराटबद्दलची एक आठवणंही सांगितली आहे. 2007 मध्ये मी ऑस्ट्रेलियाच्य दौऱ्यावर असताना विराटचं नाव ऐकलं होतं. त्यावेळी तो मलेशियामध्ये अंडर 19 वर्ल्डकप खेळत होता. आमच्या टीममध्ये अनेकजण असे होते जे त्याचं कौतुक करत, विराटची बँटींग पाहण्याजोगी असल्याचं म्हणत होतं, असं सचिन म्हणाला.