...तर श्रीलंकेला वर्ल्डकपमध्ये थेट प्रवेश नाही!

कसोटी मालिकेत श्रीलंकेविरुद्ध ३-० असे निर्भेळ यश मिळवल्यानंतर भारत उद्यापासून वनडे मालिका खेळणार आहे. कसोटी मालिकेतील विजयाची लय वनडे मालिकेत कायम राखण्याचा प्रयत्न भारतीय संघ करणार आहे. 

Updated: Aug 19, 2017, 11:20 PM IST
...तर श्रीलंकेला वर्ल्डकपमध्ये थेट प्रवेश नाही! title=

कोलंबो : कसोटी मालिकेत श्रीलंकेविरुद्ध ३-० असे निर्भेळ यश मिळवल्यानंतर भारत उद्यापासून वनडे मालिका खेळणार आहे. कसोटी मालिकेतील विजयाची लय वनडे मालिकेत कायम राखण्याचा प्रयत्न भारतीय संघ करणार आहे. 

दुसरीकडे श्रीलंकेला वनडे मालिकेत चांगली कामगिरी करणे अत्यंत गरजेचे आहे. कसोटी मालिका गमावल्यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली जातेय. त्यामुळे प्रतिष्ठा वाचवण्यासाठी श्रीलंकेला या वनडे मालिकेत चांगल्या कामगिरीसाठी नक्कीच प्रयत्न करावे लागतील. 

यासोबतच आगामी २०१९च्या वर्ल्डकप क्वालिफिकेशनसाठी त्यांना दोन वनडे जिंकणे गरजेचे आहे. भारताविरुद्ध श्रीलंकेने दोन वनडे सामन्यात विजय मिळवल्यास त्यांचे ९० गुण होतील. 

दरम्यान, वेस्ट इंडिजने जरी ३० सप्टेंबरआधी होणाऱ्या आर्यलंड आणि इंग्लंडविरुद्धचे सहाही सामने जिंकले तरी ते श्रीलंकेला मागे टाकू शकणार नाहीत. त्यामुळे श्रीलंकेला या मालिकेत दोन सामने जिंकणे अनिवार्य आहे अन्यथा त्यांना वर्ल्डकपमध्ये थेट प्रवेश मिळणार नाही.