कराची : श्रीलंकेचा संघ ८ वर्षानंतर पुन्हा पाकिस्तानात आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळण्यास तयार आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने श्रीलंकेविरुद्धच्या सीरिजची घोषणा केलीये. २८ सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिराती(यूएई) ही सीरिज सुरु होतेय. यात दोन कसोटी सामन्यांचाही समावेश आहे. ज्यात दुबईत एक दिवस-रात्र, पाच वनडे, आणि तीन टी-२० सामन्यांचा समावेश आहे.
टी-२० सीरिजमधील तिसरा सामना २९ ऑक्टोबरच्या लाहोरमधील गद्दाफी स्टेडियममध्ये खेळवला जाण्याची शक्यता आहे.
२००९मध्ये पाकिस्तामविरुद्धच्या सामन्यादरम्यान श्रीलंकेच्या संघाच्या बसवर लाहोरमध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात ६ सुरक्षारक्षक आणि २ नागरिक ठार झाले होते. या हल्ल्यात श्रीलंकेचे ६ खेळाडूही जखमी झाले होते. यानंतर झिम्बाब्वे वगळता इतर कोणत्याही देशांनी गेल्या आठ वर्षांत पाकिस्तानचा दौरा केलेला नाहीये.
लाहोरमधील एकमेव टी-२० दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील वर्ल्ड इलेव्हन संघाला लाहोरमध्ये पाकिस्तानविरुद्ध ३ सामन्यांची टी-२० सीरिज खेळायची आहे. मंगळवारपासून या सीरिजला सुरुवात होतेय.