मुंबई : स्टार फुटबॉल प्लेअर ख्रिस्तियानो रोनाल्डोवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. बाबा होण्याचा आनंद साजरा करण्याआधीच नियतीनं घात केला. 18 एप्रिल रोजी रात्री उशिरा रोनाल्डोच्या नवजात बाळाचा मृत्यू झाला.
रोनाल्डोनं सोशल मीडियावर भावुक पोस्ट लिहून याबाबत माहिती दिली. त्याने डॉक्टर आणि नर्सचे आभारही मानले. अत्यंत दु:खद बातमी आहे. आमच्या नवजात बाळाचं निधन झालं असं या पोस्टमध्ये रोनाल्डोनं लिहिलं आहे.
मुलगी सुखरुप असल्याने तिच आता आम्हाला जगण्याची आशा देईल. डॉक्टर आणि नर्स ज्यांनी आम्हाला या कठीण काळात साथ दिली त्यांचा मी खूप आभारी असंही पुढे तो म्हणाला.
रोनाल्डो आणि जॉर्जिनाने ऑक्टोबरमध्ये आनंदाची बातमी शेअर केली होती. लवकरच ते दोघं जुळ्या मुलांचे आई-बाबा होणार होते. मात्र नियतीच्या मनात नव्हतं. जुळ्यांच्या प्रसूतीदरम्यान मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. रोनाल्डोच्या मुलीची तब्येत चांगली आहे. मात्र मुलगा गमवल्याने रोनाल्डो आणि जॉर्जिना खचून गेले आहेत.
<blockquote class="twitter-tweet"><p lang="und" dir="ltr"><a href="https://t.co/vRNVCoegOW">pic.twitter.com/vRNVCoegOW</a></p>— Cristiano Ronaldo (@Cristiano) <a href="https://twitter.com/Cristiano/status/1516120150533095432?ref_src=twsrc%5...">April 18, 2022</a></blockquote> <script async src="https://platform.twitter.com/widgets.js" charset="utf-8"></script>