ICC Test Ranking | कसोटी क्रमवारीत ही विराटचा जलवा कायम...

आयसीसीने नुकतीच कसोटी क्रमवारी (Icc Test Ranking) जाहीर केली आहे. 

Updated: Jun 16, 2021, 05:19 PM IST
ICC Test Ranking | कसोटी क्रमवारीत ही विराटचा जलवा कायम...

मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यासाठी (World Test Championship Final)  आता अवघे काही तास उरले आहेत. टीम इंडिया (Team India) आणि न्यूझीलंड (New Zealand) या महामुकाबल्यासाठी सज्ज आहेत. याआधी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि पर्यायाने भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आयसीसीने नुकतीच कसोटी क्रमवारी (Icc Test Ranking) जाहीर केली आहे. यामध्ये विराटला एका स्थानाचा फायदा झाला आहे. तसेच फलंदाजांच्या टॉप 10 रॅंकिंगमध्ये विराटसह 3 भारतीयांचा समावेश आहे. (Steve Smith tops  position in ICC Test rankings  Virat Kohli jumps to 4th position)

विराटला एका स्थानाचा फायदा

आयसीसीच्या या क्रमवारीनुसार विराटने पाचव्या स्थानावरुन चौथ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. विराटने इंग्लंडचा कर्णधार जो रुटला पछाडत चौथं स्थान मिळवलं आहे. त्यामुळे रुटची पाचव्या क्रमांकावर घसरण झाली आहे.  ताज्या आकडेवारीनुसार विराटच्या नावे 814 रेटिंग्स पॉइंट्स आहेत.

रोहित-रिषभ सहाव्या क्रमांकावर कायम

दुसऱ्या बाजूला हिटमॅन रोहित शर्मा आणि रिषभ पंत या जोडीला सहावं स्थान कायम राखण्यात यश आलंय. ही जोडी 747 पॉइंट्ससह संयुक्तरित्या सहाव्या क्रमांकावर कायम आहेत.

पहिल्या क्रमांकावर कोण?

ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथने क्रमवारीत अव्वल क्रमांकावर झेप घेतली आहे. स्मिथने न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमन्सनला मागे टाकत पहिला क्रमांक पटकावला आहे. 

केनला इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीला दुखापतीमुळे मुकावे लागले होते. केनला याचाच जबर फटका हा क्रमवारीत बसलाय. स्टीव्ह 891 रेटिंग्स पॉइंट्ससह पहिल्या क्रमांकावर आहे. तर केन 886 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. म्हणजेच पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकामध्ये 5 गुणांचा फरक आहे.  

संबंधित बातम्या : 

WTC Final : भारतीय संघातून 'या' महत्त्वाच्या खेळाडूला वगळलं

WTC Final साठी टीम इंडियाची घोषणा, अशी आहे विराटसेना