Rohit Sharma: अशी परिस्थिती नकोय...; श्रीलंकेच्या सामन्यापूर्वी रोहित शर्मा 'या' कारणामुळे टेन्शनमध्ये

Rohit Sharma: सामन्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माची पत्रकार परिषद घेण्यात आली. ज्यामध्ये रोहित शर्माने ( Rohit Sharma ) एक चिंता व्यक्त केली आहे. सामन्यापूर्वी रोहित शर्मा ( Rohit Sharma ) नेमक्या कोणत्या कारणाने चिंतेत आहे ते पाहूया. 

सुरभि जगदीश | Updated: Nov 2, 2023, 08:37 AM IST
Rohit Sharma: अशी परिस्थिती नकोय...; श्रीलंकेच्या सामन्यापूर्वी रोहित शर्मा 'या' कारणामुळे टेन्शनमध्ये title=

Rohit Sharma: टीम इंडिया आज वानखेडेच्या मैदानावर श्रीलंकेविरूद्ध सामना खेळणार आहे. टीम इंडियाचा वर्ल्डकपमधील हा सातवा सामना असणार आहे. या सामना जिंकल्यावर टीम इंडियाला ( Team India ) सेमीफायनलचं तिकीट देखील मिळू शकणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माची पत्रकार परिषद घेण्यात आली. ज्यामध्ये रोहित शर्माने ( Rohit Sharma ) एक चिंता व्यक्त केली आहे. सामन्यापूर्वी रोहित शर्मा ( Rohit Sharma ) नेमक्या कोणत्या कारणाने चिंतेत आहे ते पाहूया. 

सामन्यापू्र्वी रोहित 'या' कारणाने चिंतेत

श्रीलंकेविरुद्धच्या सामन्याच्या पूर्वी कर्णधार रोहित शर्माने ( Rohit Sharma ) भारतीय शहरांमधील हवेच्या खराब गुणवत्तेवर तीव्र चिंता व्यक्त केली. सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना रोहित ( Rohit Sharma ) म्हणाला, सध्याची परिस्थिती आदर्श नाही आणि येणाऱ्या पिढ्यांना न घाबरता जगण्याची संधी मिळणं महत्त्वाचं आहे. जीवन जगण्यासाठी तुम्हाला अशी परिस्थिती नकोय. मला खात्री आहे की, अशी परिस्थिती टाळण्यासाठी लोकं आवश्यक पावलं उचलत आहेत. असं वातावरण योग्य नाही आणि प्रत्येकाला हे माहितीये.

हवेच्या गुणवत्तेवर केवळ रोहित शर्मा ( Rohit Sharma ) नाही तर अजून एका खेळाडूने आवाज उठवला होता. वर्ल्डकपमध्ये मुंबईत दक्षिण आफ्रिकेकडून इंग्लंडचा पराभव झाल्यानंतर जो रूटने हवेच्या गुणवत्तेवर भाष्ये केलं होतं. रुट म्हणाला होता, 'मी याआधी कधीच असा खेळलो नाही. मी गरम असलेल्या वातावरणात खूप खेळलोय. पण इथे श्वास घेता येत नाही असं वाटतंय.

टीम इंडियाला मिळणार का सेमीफायनलचं तिकीट?

श्रीलंकेविरूद्ध टीम इंडिया ( Team India ) मैदानात उतरणार असून हा विजय सेमीफायनलमध्ये स्थान मिळवून देणार आहे. अजून कोणताही संघ सेमीफायनलमध्ये पोहोचलेला नाही. या स्पर्धेतील भारत हा एकमेव संघ आहे जो अद्याप पराभूत झालेला नाही. हा वर्ल्डकप श्रीलंकेसाठी फारसा चांगला राहिलेला नाहीये. श्रीलंका पॉईंट्स टेबलमध्ये सातव्या स्थानावर आहेत. त्यांनी आतापर्यंत फक्त दोनच सामने जिंकले आहेत आणि चार गमावले आहेत.