WI vs IND : लाईव्ह सामन्यात अचानक विराटने सांभाळला मोर्चा; कर्णधार रोहितलाही केलं शांत...पाहा नेमकं काय घडलं?

WI vs IND : प्रथम फलंदाजी करत टीम इंडियाने ( Team India ) 438 रन्स केले. टीम इंडिया ( Team India ) फिल्डींगसाठी उतरली तेव्हा भर मैदानात एक घटना पाहायला मिळाली, ज्यावेळी विराट कोहली ( Virat Kohli ) कर्णधार रोहित शर्मासह ( Rohit Sharma ) टीममधील इतर खेळाडूंना समजावताना दिसतोय. 

सुरभि जगदीश | Updated: Jul 23, 2023, 04:36 PM IST
WI vs IND : लाईव्ह सामन्यात अचानक विराटने सांभाळला मोर्चा; कर्णधार रोहितलाही केलं शांत...पाहा नेमकं काय घडलं? title=

WI vs IND : सध्या वेस्ट इंडिज विरूद्ध भारत ( WI vs IND ) यांच्यामध्ये दुसरा टेस्ट सामना खेळवण्यात येतोय. या सामन्यामध्ये वेस्ट इंडिजने ( West Indies ) टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करत टीम इंडियाने ( Team India ) 438 रन्स केले. यानंतर जेव्हा टीम इंडिया ( Team India ) फिल्डींगसाठी उतरली तेव्हा भर मैदानात एक घटना पाहायला मिळाली, ज्यावेळी विराट कोहली ( Virat Kohli ) कर्णधार रोहित शर्मासह ( Rohit Sharma ) टीममधील इतर खेळाडूंना समजावताना दिसतोय. 

विराटने घातली रोहितची समजूत

आर अश्विन ( Ravichandran Ashwin ) सामन्यादरम्यान गोलंदाजी करत होता. यावेळी जर्मेन ब्लॅकवुड स्ट्राइकवर होता. अश्विनच्या लेगस्टंपला जाणाऱ्या बॉलने ब्लॅकवूडच्या पॅडला स्पर्श केला. यावेळी हा बॉल मागे असलेल्या यष्टीरक्षक इशान किशनच्या ( Ishan Kishan ) हाती गेला. 

क्षणाचाही विलंब न करता गोलंदाजासह सर्व खेळाडूंनी आऊटसाठी अपील केलं. भारतीय खेळाडूंनी केलेलं हे अपील अंपायरने फेटाळलं. यानंतर इतर खेळाडू कर्णधार रोहितला ( Rohit Sharma ) डीआरएस घेण्यासाठी सांगू लागले. यावेळी स्लिपमध्ये उभ्या असलेल्या विराट कोहलीने रोहितला डीआरएस न घेण्याबाबत सांगितलं. यावेळी बराच वेळी विराट ( Virat Kohli ) रोहित समजवताना दिसला. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर ( Social Media Viral Video ) व्हायरल होताना दिसून येतोय.

विराटचा 500 वा सामना 

वेस्ट इंडिजविरूद्धची दुसरी टेस्ट ही असून विराट कोहलीचा ( Virat Kohli ) हा 500 वा सामना आहे. हा सामना संस्मरणीय बनवत विराट कोहलीने ( Virat Kohli ) या सामन्यात उत्तम पद्धतीने शतक झळकावलं. कोहलीच्या टेस्ट कारकिर्दीतील हे 29 वं शतक होतं. त्याने या सामन्यात त्याच्या कारकिर्दीतील 76 वं शतक ठोकलं.

यावेळी विराटने ( Virat Kohli ) क्रिकेटच्या इतिहासातील महान फलंदाज मानले जाणारे सर डॉन ब्रॅडमन यांच्या 29 टेस्ट शतकांची बरोबरी केलीये. या सामन्याच्या पहिल्या इनिंगमध्ये कोहलीने 206 बॉल्समध्ये 121 रन्स केले.