टीम इंडियाला सुनील गावसकरांकडून नवा आत्मविश्वास, पाहा काय म्हणाले लिटील मास्टर

टीम इंडियाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर हे टीम इंडियाच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत.

Updated: Oct 27, 2021, 02:57 PM IST
टीम इंडियाला सुनील गावसकरांकडून नवा आत्मविश्वास, पाहा काय म्हणाले लिटील मास्टर

मुंबई : टीम इंडियाला T-20 वर्ल्डकप स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात पाकिस्तानकडून 10 विकेट्स राखत पराभव पत्करावा लागला होता. टी-20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडिया पहिल्यांदाच पाकिस्तानकडून पराभूत झाला. या पराभवानंतर एकच खळबळ उडाली. टीम इंडियावर सर्व स्तरातून टीका होताना दिसतेय. दरम्यान, टीम इंडियाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर हे टीम इंडियाच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत.

सुनील गावस्कर यांच्याकडून टीमचं समर्थन

या एका पराभवाने टीम इंडियाचा प्रवास संपलेला नाही, असं मत भारताचे माजी फलंदाज सुनील गावस्कर यांचं म्हणणं आहे. सुनील गावस्कर यांनी टीम इंडियाला मोठा सल्ला दिला असून पराभव विसरून येणाऱ्या सामन्यांवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे असंही म्हटलं आहे. स्टार स्पोर्ट्सशी बोलताना सुनील गावस्कर म्हणाले, "टीम इंडियाचा प्रवास फक्त एका पराभवाने संपत नाही. संघाने एकसंध राहण्याची गरज आहे. त्यांनी मागील पराभव विसरून आगामी सामन्यांवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे."

गावस्करांकडून कोहलीची स्तुती

सुनील गावस्कर म्हणाले, "आशा आहे की येत्या सामन्यांमध्ये टीम इंडिया चांगली कामगिरी करेल. टीमने आता पाकिस्तानविरुद्धचा पराभव विसरून पुढील सामन्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. सुनील गावस्कर यांनी भारतीय कर्णधार विराट कोहलीचं कौतुक केलंय. कोहलीने पाकिस्तानविरुद्ध 57 रन्सची खेळी खेळली. त्यानंतर गावस्कर यांनी त्याला एक उत्कृष्ट खेळाडू म्हटलंय.

गावस्कर म्हणाले, 'भारताने पाकिस्तानविरुद्ध दोन विकेट गमावल्या, त्यानंतर कोहलीने केवळ डाव सांभाळला नाही तर संघाला चांगल्या धाव संख्येपर्यंत नेलं. कोहलीने चांगल्या पद्धतीने डाव हाताळला."

गावस्कर यांनीही शाहीनचं कौतुक करताना सांगितलं की, 'शाहीनने खूप चांगली गोलंदाजी केली. कोहलीसाठी क्रीजच्या पुढे येऊन शाहीनविरुद्ध धावा करणं महत्त्वाचं होतं. शाहीनचा चेंडू ज्या प्रकारे स्विंग होत होता, त्यासाठी विराटने योग्य रणनीती अवलंबली."