M S Dhoni contempt of court case: टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने (MS Dhoni) केलेल्या याचिकेवर मद्रास हायकोर्टाने डिसेंबर 2022 मध्ये निवृत्त आयपीएस अधिकारी जी संपत कुमार यांना 15 दिवासांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेला संपत कुमार यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं. आता सुप्रीम कोर्टाने यावर निकाल देताना मद्रास हायकोर्टाच्या निर्णयवर अंतरिम स्थगिती दिली आहे.
धोनीने दाखल केली होती याचिका
सुप्रीम कोर्टाचे न्यायमुर्ती अभय एस ओका आणि न्यायमूर्ती उज्ज्ल भुइयां यांच्या खंडपीठाने हायकोर्टाच्या आदेशावर स्थगितीदेत आयपीएस अधिकारी संपत कुमार (G Sampat Kumar) यांनी दाखल केलेल्या याचिकेवर नोटीस जारी केली आहे. याप्रकरणाची पुढची सुनावणी 8 मार्च 2024 ला होणार आहे. धोनीने 2022 मध्ये अपमानकारक टिपण्णी केल्याप्रकरणी आयपीएस अधिकारी जी संपत कुमार यांच्याविरुद्ध अवमान याचिका दाखल केली होती. या याचिकेत धोनीने संपत कुमार यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी केली होती. यावर मद्रास हायकोर्टाने (Madras Highcourt) निकाल देताना संपत कुमार यांनी जाणूनबुझून हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाची (Supreme Court) बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका ठेवण्यात आला.
याशिवाय संपत कुमार यांना 30 दिवसांसाठी निलंबित करण्यात आलं. मद्रास हायकोर्टाच्या या निकालाविरोधात जी संपत कुमार यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. आयपीएल 2014 मध्ये सट्टेबाजीत जी संपत कुमार यांनी महेंद्रसिंग धोनीचं नाव घेतलं होतं. याविरोधात धोनीने मानहानीची तक्रार दाखल करत 100 कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याची मागणी केली होती.
महेंद्रसिंग धोनीची बदनामी करण्याच्या हेतूने जी संपत कुमार यांनी आरोप केल्याचं मद्रास हायकोर्टाने म्हटलं होतं. तसंच संपत कुमार यांना 15 दिवसांची तुरुंगावासाची शिक्षा सुनावली होती. पण सुप्रीम कोर्टाने ही शिक्षा स्थगित केली आहे. त्यामुळे एमएस धोनीला मोठा धक्का बसला आहे.
धोनीची क्रिकेट कारकिर्द
भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून एमएस धोनीचं नाव घेतलं जातं. आयसीसीच्या तीनही ट्ऱॉफी जिंकणारी ता एकमेव भारतीय कर्णधार आहे. 2007 मध्ये टी20 विश्वचषक, 2011 मध्ये एकदिवसीय विश्वचषक आणि 2013 मध्ये चॅम्पियनस ट्ऱॉफी टीम इंडियानेधोनीच्या नेतृत्वात जिंकलीय. फलंदाज, विकेटकिपर आणि कर्णधार अशी कामगिरी बजावत एकिदवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 183 धावा करण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे.
धोनीने कसोटी, एकदिवसीय आणि टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट फॉर्मेटमध्ये तब्बल 332 सामन्यात टीम इंडियांचा नेतृत्व केलं आहे. रिकी पॉण्टिंगने 324 सामन्यात ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व केलं होतं. धोनीने 332 सामन्यांपैकी 178 सामन्यात विजय मिळवला. 120 सामन्यात त्याला पराभव पत्करावा लागला. तर 6 सामने टाय आणि 15 ड्रॉ राहिले. धोनीने टीम इंडियासाठी 90 कसोटी सामन्यात 4876, धावा, 350 एकदिवसीय सामन्यात 10773 धावा केल्या आहेत. तर 98 टी20 सामन्यात 1617 धावा केल्या आहेत. तर आयपीएलमध्ये त्याच्या नावावर 5082 धावा जामा आहेत.