विराट, रोहित नाही तर हा आहे सर्वात खतरनाक खेळाडू- वसीम अकरम

भारतीय संघात सर्वात धोकादायक खेळाडू कोण? माजी पाकिस्तानी क्रिकेटरने पाहा काय म्हटले आहे.

Updated: Aug 23, 2022, 11:06 PM IST
विराट, रोहित नाही तर हा आहे सर्वात खतरनाक खेळाडू- वसीम अकरम title=

IND vs PAK : 28 ऑगस्ट रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार आहे. आशिया कप T20 मधील या क्रिकेट सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पाकिस्तानचा महान वेगवान गोलंदाज वसीम अक्रमन याने दोन्ही देशांच्या क्रिकेटप्रेमींनी याला केवळ क्रिकेट सामन्याप्रमाणेच पाहावे, असे आवाहन केले आहे. शाहीन शाह आफ्रिदी टीममधून बाहेर झाल्याने पाकिस्तानला मोठा झटका बसला आहे. 

भारतीय संघात रोहित शर्मा, विराट कोहली नव्हे तर आणखी एक खेळाडू सर्वात धोकादायक असल्याचे माजी पाकिस्तानी क्रिकेटरने म्हटले आहे.

आशिया कप 2022 स्पर्धा 27 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. सुरुवातीच्या दुसऱ्याच दिवशी विजेतेपदाचे प्रबळ दावेदार भारत आणि पाकिस्तान हे संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. याबाबत पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज आणि कर्णधार वसीम अक्रमने व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत सांगितले की, "सर्वांच्या नजरा या सामन्याकडे लागल्या आहेत कारण लोकांना या दोन संघांना एकत्र खेळताना पाहण्याची सवय नाही, त्यामुळे ते या सामन्याची वाट पाहत आहेत." मी दोन्ही देशांच्या क्रिकेटप्रेमींना विनंती करू इच्छितो की याला फक्त एक क्रिकेट सामना म्हणून घ्या ज्यामध्ये एक संघ हरेल आणि एक जिंकेल.

अक्रम पुढे म्हणाला की, गेल्या वर्षी टी-२० विश्वचषकात भारताला पराभूत केल्यानंतर पाकिस्तान संघ पुन्हा जोमात आला आहे आणि नव्या आत्मविश्वासाने मैदानात उतरेल. गेल्या वर्षी टी-20 विश्वचषकात भारताला पराभूत करून पाकिस्तानला प्रोत्साहन मिळाले आहे. हा युवा संघ आहे पण सातत्याने चांगला खेळ करत आहे. मिडल ऑर्डर हा कमकुवत दुवा असू शकतो ज्याचा इफ्तिखार अहमद व्यतिरिक्त इतर कोणालाही अनुभव नाही. या सामन्यातील विजयाची गुरुकिल्ली दोन्ही संघांची मानसिकता असेल. आशिया चषक स्पर्धेतील दोन्ही संघांसाठी हा सर्वात महत्त्वाचा सामना आहे.

सूर्यकुमार यादवचे भारतीय संघातील सर्वात धोकादायक खेळाडू असल्याचे वर्णन करताना अक्रम म्हणाला, "भारतात रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली सारखे अनेक दिग्गज आहेत, परंतु माझ्या मते या क्षणी सर्वात धोकादायक सूर्यकुमार यादव आहे. त्याच्याकडे 360-अंश शॉट्स आहेत.