Ind vs Nz: नाम तो सुना होगा सूर्याsss! 40 धावा करणार अन् माही-रैनाचा विक्रम मोडणार

IND vs NZ T20 : टी-20 मालिकेला आजपासून सुरूवात होत असून पहिला सामना रांची येथे खेळवला जाणार आहे. 360 डिग्री प्लेअर म्हणून ओळखला जाणारा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादवकडे सर्वांच्या नजरा असणार आहेत. सूर्यकुमार यादव मोठा विक्रम रचण्याच्या मार्गावर आहे.

Updated: Jan 27, 2023, 04:36 PM IST
Ind vs Nz: नाम तो सुना होगा सूर्याsss! 40 धावा करणार अन् माही-रैनाचा विक्रम मोडणार title=

IND vs NZ T20 ​: भारत आणि न्यूझीलंडमधील वनडे मालिकेनंतर आता टीम इंडियाचं टी-20 मालिकेवर लक्ष्य आहे. तीन वनडे सामन्यांच्या मालिकेमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली 3-0 ने व्हाईटवॉश देत वनडे रँकिंगमध्ये पहिल्या क्रमांकाचं स्थान पटकावलं आहे. टी-20 मालिकेला आजपासून सुरूवात होत असून पहिला सामना रांची येथे खेळवला जाणार आहे. या सामन्यामध्ये 360 डिग्री प्लेअर म्हणून ओळखला जाणारा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादवकडे सर्वांच्या नजरा असणार आहेत. सूर्यकुमार यादव मोठा विक्रम रचण्याच्या मार्गावर आहे. (Suryakumar Yadav will break the record of Dhoni and Raina after scoring 40 runs latest marathi sport news)

सूर्यकुमारने या सामन्यात 40 धावा केल्या तर महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) आणि सुरेश रैना (Suresh Raina) यांचा रेकॉर्ड मोडणार आहे. सूर्याने अवघ्या 45 सामन्यांमधील 43 डावात 1578 धावा केल्या आहेत. आजच्या न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यात सूर्याने 40 धावा केल्या तर सूर्या टी-20 मध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या यादीमध्ये तो पाचव्या स्थानावर पोहचणार आहे. 

महेंद्रसिंह धोनीने 98 सामन्यांच्या 85 डावांमध्ये 1617 धावा केल्या आहेत. तर रैनाच्या 78 सामन्यांच्या 66 डावांमध्ये 1605 धावा आहेत. सूर्य कुमारने अवघ्या 43 डावांमध्ये 1500 धावांचा टप्पा पार केला आहे. भारतीय संघाच्या कर्णधारपदाची धुरा हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात आली आहे. 

भारतीय संघाचा स्टार खेळाडू ऋुतुराज गायकवाड दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. ऋुतुराज बाहेर झाल्यामुळे संघात परतलेल्या पृथ्वी शॉला संघात संधी मिळणार असं वाटतं होतं. मात्र शुभमन गिल आणि ईशान किशन हे भारताकडून सलामीला येणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे शॉ ला आणखी वाट पाहावी लागणार आहे. 

दरम्यान, भारताने वनडे मालिकेमध्ये न्यूझीलंडला पराभूत केल्यावर आता टी-20 मालिका तरी पाहुण्या संघाला खिशात घालता येते की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

पहिल्या टी-20 साठी दोन्ही संघाचे संभाव्य XI :
भारतीय संघ :
शुभमन गिल, इशान किशन (विकेटकीपर), राहुल त्रिपाठी, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (c), दीपक हुड्डा, वॉशिंग्टन सुंदर, शिवम मावी, उमरान मलिक, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल/कुलदीप यादव

न्यूझीलंड संघ : फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे (विकेटकीपर), मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, मायकेल ब्रेसवेल, मिचेल सँटनर (c), लॉकी फर्ग्युसन, ईश सोधी, ब्लेअर टिकनर, बेन लिस्टर/जेकब डफी