India vs Pakistan : टीम इंडिया-पाकिस्तान ऑक्टोबरमध्ये 2 वेळा भिडणार

आगामी टी 20 वर्ल्ड कप 2022 मध्ये (T 20 World Cup 2022) हो दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी आमनेसामने भिडणार आहेत. मात्र ते एकदा नाही, तर ऑक्टोबर महिन्यात दोनवेळा आमनेसामने येणार आहेत.

Updated: Sep 21, 2022, 06:30 PM IST
India vs Pakistan : टीम इंडिया-पाकिस्तान ऑक्टोबरमध्ये 2 वेळा भिडणार title=

मुंबई : भारत-पाकिस्तान सामना (India vs Pakistan) म्हणजे क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी पर्वणीच. प्रत्येक क्रिकेट चाहता या दोन कट्ट्र प्रतिस्पर्धी संघाच्या सामन्याची आवर्जून वाट पाहत असतो. आगामी टी 20 वर्ल्ड कप 2022 मध्ये (T 20 World Cup 2022) हो दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी आमनेसामने भिडणार आहेत. मात्र ते एकदा नाही, तर ऑक्टोबर महिन्यात दोनवेळा आमनेसामने येणार आहेत. नुकतंच दोन्ही संघ आशिया कपमध्ये 2 वेळा (Asia Cup 2022) भिडले होते. तर आता वुमेन्स टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध दोन हात करणार आहे. (t 20 world cup 2022 team india  vs pakistan and womens asia cup 2022 team india and pakistan clashes)

मेन्स टी 20 वर्ल्ड कपला 16 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात सुरुवात होणार आहे. टीम इंडियाच्या वर्ल्ड कप मोहिमेची सुरुवात 23 ऑक्टोबरपासून होणार आहे. टीम इंडियाचा पहिलाच सामना हा पाकिस्तानशी होणार आहे. T20 वर्ल्ड कपमध्ये दोन्ही संघ वर्षभरानंतर आमनेसामने येणार आहेत. दुबईत गेल्या वर्षी पाकिस्तानने भारताचा पराभव केला होता. त्या सामन्यातील पराभवाचा बदला घेण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरेल.

टी20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रविचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल आणि अर्शदीप सिंह. 

राखीव खेळाडू : मोहम्मद शमी, दीपक चाहर, श्रेयस अय्यर आणि रवि बिश्नोई. 

वूमेन्स आशिया कपचं आयोजन हे बांगलादेशमध्ये 1-15 ऑक्टोबर दरम्यान करण्यात आलंय. आशिया कपमध्ये टीम इंडिया, पाकिस्तान, श्रीलंका, थायलँड, मलेशिया, यूएई आणि बांगलादेश सहभागी होणार आहेत. वुमेन्स टीम इंडिया 7 ऑक्टोबरला पाकिस्तानसोबत दोन हात करणार आहे. वुमेन्स टीम इंडिया रॉबिन राउंड प्रकारमध्ये एकूण 6 सामने खेळणार आहे. त्यानंतर बाद फेरीला सुरुवात होईल.  

आशिया कपसाठी वुमेन्स टीम इंडिया :  हरमनप्रीत कौर (कॅप्टन), स्मृति मंधाना (उपकर्णधार), दीप्ती शर्मा, शेफाली वर्मा, जेमिमाह रोड्रिग्स, सब्बिनेनी मेघना, ऋचा घोष (विकेटकीपर) पूजा वस्त्राकर, राजेश्वरी गायकवाड, राधा यादव आणि केपी नवगिरे. 

राखीव खेळाडू : तन्या सपना भाटिया आणि सिमरन दिल बहादुर.