टीम इंडिया काही तीस मार खान...; Shoaib Akhtar इतका का संतापला?

एक बेताल वक्तव्य शोएब अख्तर यांनी केलंय. 

Updated: Oct 28, 2022, 06:58 PM IST
टीम इंडिया काही तीस मार खान...; Shoaib Akhtar इतका का संतापला? title=

मेलबर्न : T-20 World Cup ला दणक्यात सुरुवात झाली. भारतानं कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला गुडघे टेकण्यास भाग पाडलं. तर झिम्बाब्वेनं पाकिस्तानला मैदानात धुळ चारली. जो पाकिस्तान आपल्या बॉलिंगच्या जीवावर वर्ल्डकप जिंकण्याचा दावा करत होता. त्याच पाकिस्तानची T-20 World Cup मधली पुढील वाटचाल अंधारात आहे. स्वत:च्या देशाची दर्जाहीन कामगिरी पाहून पाकिस्तानचे माजी क्रिकेटर सुद्धा बेताल वक्तव्य करु लागले आहेत. असंच एक बेताल वक्तव्य शोएब अख्तर यांनी केलंय. 

काय म्हणाला शोएब अख्तर? 

मी या आधी म्हटलं होतं की पाकिस्तान या आठवड्यात पुन्हा मायदेशी परतेल आणि पुढच्या आठवड्यात भारत मायदेशी जाईल. भारत काय तीस मार खान नाही, असं शोएब अख्तरने म्हटलं आहे, 

शोएब अख्तर याचा हा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होतोय. अनेकांनी त्यांच्या वक्तव्यावर जोरदार टीका केलीय. भारतीय संघ सध्या जोरदार फॉर्ममध्ये आहे. यंदा भारतच वर्ल्डकप जिंकेल अशी अशा अनेकांनी व्यक्त केलीय. मात्र क्रिकेटमध्ये अखेरच्या बॉल फेकेपर्यंत मॅचचा निर्णय होत नसतो याचा बहुदा शोएब अख्तर याला विसर पडला असावा. 

पाकिस्तानचा पराभव

पहिल्यांदा फलंदाजी करताना झिम्बाव्बेने पाकिस्तानला 131 रन्सचं टारगेट दिलं होतं. यानंतर पाकिस्तानच्या फलंदाजांना 129 पर्यंतच मजल मारता आली. शेवटच्या ओव्हरमध्ये पाकिस्तानला जिंकण्यासाठी 11 रन्सची आवश्यकता होती. मात्र अवघे 9 रन्स करता आल्याने पाकिस्तानचा पराभव झाला.

पाकिस्तानचे फलंदाज पुन्हा फ्लॉप

या सामन्यात पाकिस्तानची फलंदाजी पूर्णपणे फ्लॉप ठरताना दिसली. पाकिस्तानचा सलामीवीर बाबर आझम 9 बॉल्समध्ये केवळ 4 रन्स करू शकला, तर मोहम्मद रिझवानने 16 बॉल्ममध्ये 14 रन्स करू शकला. पाकिस्तानकडून शान मसूदने 44 रन्स केले. त्याच्याशिवाय एकाही फलंदाजाला 30 रन्सचा टप्पाही स्पर्श करता आला नाही. दुसरीकडे झिम्बाब्वेकडून सिकंदर रझाने ३ विकेट्स घेतलेत.

शेवटच्या बॉलपर्यंत रंगला सामना

पर्थच्या मैदानावर रंगलेला हा सामना खूप रोमांचक ठरला. या सामन्यात अखेर झिम्बाब्वेने बाजी मारली. पहिल्यांदा फलंदाजी करत झिम्बाब्वेने 8 विकेट्स गमावत 130 रन्स केले. तर 131 रन्सचा पाठलाग करताना पाकिस्ताननेही 8 विकेट्स गमावत 129 रन्स केले.