टी 20 वर्ल्ड कपपूर्वी पाकिस्तानी खेळाडूंसाठी वाईट बातमी, 'हे' पदार्थ खाण्यावर बंदी

2019 च्या विश्वचषकात भारताकडून पराभूत झाल्यानंतर पाकिस्तान संघाच्या फिटनेसबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले.

Updated: Oct 15, 2021, 08:16 PM IST
टी 20 वर्ल्ड कपपूर्वी पाकिस्तानी खेळाडूंसाठी वाईट बातमी, 'हे' पदार्थ खाण्यावर बंदी title=

मुंबई : टी 20 वर्ल्ड कपची सुरूवात 17 ऑक्टोबरपासून दुबईत सुरु होणार आहे. त्यात 24 ऑक्टोबर 2021ला भारत विरुद्ध पाकिस्तान असा खेळ रंगणार आहे. ज्याची उत्सुकता दोन्ही देशातील लोकांना लागली आहे. पाकिस्तानची टीम भारताला हरवण्यासाठी तसेच या खेळात टिकून राहण्यासाठी खूप मेहनत घेत आहेत. पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझमने देखील ही शक्यता व्यक्त केली आहे. परंतु त्यापूर्वी पाकिस्तानी खेळाडूंसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. कारण खेळाडूंना काही पदार्थ खाण्यासाठी बंदी करण्यात आली आहे.

2019 च्या विश्वचषकात भारताकडून पराभूत झाल्यानंतर पाकिस्तान संघाच्या फिटनेसबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले. खेळाच्या मध्यभागी पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमद जांभई घेताना कॅमेऱ्यात कैद झाला. त्यानंतर असे सांगण्यात आले की, सामन्याच्या फक्त एक रात्री आधी पाकिस्तान संघाने बर्गर, पिझ्झा बिर्याणीसारखे जंक फूड खाल्ले होते, ज्यामुळे ते मॅचमध्ये सुस्तावलेले दिसत होते.

आता पाकिस्तानचे नवे मुख्य प्रशिक्षक आणि मुख्य निवडकर्ता मिसबाह-उल-हक यांनी देशांतर्गत स्पर्धा आणि राष्ट्रीय शिबिरात सहभागी खेळाडूंचा आहार बदलला आहे. मिसबाहने आदेश जारी केले आहेत की देशांतर्गत हंगामात आणि राष्ट्रीय शिबिरात खेळाडूंसाठी कोणताही जड आहार उपलब्ध होणार नाही.

हे करण्यामागे मिसबाह-उल-हक यांनी कारण सांगितले की, खेळाडूंना राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्यासाठी इष्टतम तंदुरुस्ती प्राप्त करावी लागेल." यापुढे खेळाडूंना बिर्याणी आणि तेलकट रेड मीट असलेले अन्न किंवा मिठाई दिली जाणार नाही,"

पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू मिसबाह यांची नुकतीच टीमचे मुख्य प्रशिक्षक आणि मुख्य निवडकर्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर माजी वेगवान गोलंदाज वकार युनूस संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकाची जबाबदारी सांभाळेल. दोघेही तिन्ही फॉरमॅटमध्ये ही जबाबदारी पार पाडतील आणि त्यासाठी त्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डासह (पीसीबी) तीन वर्षांचा करारही केला आहे.

मे 2017 मध्ये मिसबाहने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप दिला. तो म्हणाला, 'माझ्यासाठी हा सन्मान आहे आणि त्यापेक्षाही मोठी जबाबदारी आहे कारण आपण क्रिकेट जगतो आणि क्रिकेट आपल्या श्वासात आहे.'

टी 20 वर्ल्ड कपसाठी सुधारित टीम इंडिया :  विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (विकेटकीपर), ईशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, रवीचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी. 
 
राखीव खेळाडू : श्रेयस अय्यर, दीपक चाहर आणि अक्षर पटेल.  

पाकिस्तान : बाबर आजम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आसिफ अली, सोहैब मसूद, सरफराज अहमद (विकेटकीपर), हैदर अली, फखर जमान, मोहम्मद हफीज, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम जूनियर, शाहीन अफरीदी, हॅरिस रौफ, हसन अली आणि इमाद वसीम. 

रिजर्व प्लेअर : उस्मान कादीर, शाहनवाज दहानी आणि  खुशदिल शाह.