Sunil Gavaskar On Team India Practice Session: क्रिकेट विश्वातून मोठी बातमी. माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी टीम इंडियातील खेळाडूंना चांगलेच खडसावले आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील टीम इंडिया उद्या 23 ऑक्टोबरला T20 विश्वचषक 2022 मध्ये आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. टीम इंडिया आपला पहिला सामना पाकिस्तानसारख्या मोठ्या संघाविरुद्ध खेळणार आहे. या शानदार सामन्यापूर्वी टीम इंडिया जोरदार सराव करत आहे. या सगळ्यामध्ये टीम इंडियाने असे काही केले ज्यामुळे माजी दिग्गज सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) नाराज झाले. त्यांनी खेळाडूंचा चांगलाच समाचार घेतला.
पाकिस्तानविरुद्ध खेळल्या जाणार्या सामन्यापूर्वी दोन वेळा टीम इंडियाने ऐच्छिक सराव सत्र बोलावले होते. सर्व खेळाडूंना पर्यायी सराव सत्रात सहभागी होणे बंधनकारक नाही, असेही सांगण्यात आले. टीम इंडियाची ही भूमिका पाहून सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) भडकले. सुनील गावस्कर यांचे मत आहे की, हा मोठा सामना पाहता सर्व खेळाडूंनी सराव सत्राचा सहभागी व्हायला हवे होते. मात्र या सराव सत्रात टीम इंडियाचे अनेक स्टार खेळाडू दिसले नाहीत.
'इंडिया टुडे'शी बोलताना सुनील गावस्कर म्हणाले, 'मी हे मान्य करत नाही. कारण मेलबर्नला येण्यापूर्वी तुमचा सराव सामना पावसामुळे वाहून गेला होता. मग एका दिवसाच्या सुट्टीनंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी सराव न करण्याचे कारण सांगता. जे दिवसाच्या शेवटी सरावासाठी येत नाहीत ते मॅच विनर होऊ शकतात. पण तुम्हाला एक संघ म्हणून लय हवी आहे. तुम्ही उद्देशाची भावना पहायची आहे.' सरावला सुट कशी मिळते, या टीम इंडियाच्या निर्णयाशी आपण सहमत नाही, असे गावस्कर म्हणाले.
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, आर पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, आर अश्विन, चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी.
राखीव खेळाडू - शार्दुल ठाकूर, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज.
बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), आसिफ अली, हैदर अली, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, शान मसूद, उस्मान कादिर.
राखीव खेळाडू - मोहम्मद हरीस, फखर जमान आणि शाहनवाज डहानी.