T20 World Cup 2024 Afghanistan vs Australia: टी-20 वर्ल्ड कपमध्ये साखळी फेरीत अमेरिकेने पाकिस्तानचा पराभव करुन मोठा धक्का दिल्यानंतर आज सुपर 8 च्या फेरीत अफगाणिस्ताननेही ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्याचा भीमपराक्रम करुन माजी जग्गजेत्या संघाला मोठा धक्का दिला आहे. या विजयामुळे भारताचा सामवेश असलेल्या ग्रुप 1 मधून उपांत्यफेरी गाठण्याचा ऑस्ट्रेलियाचा मार्ग आणखीन खडतर झाला आहे.
ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. अफगाणिस्तानने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 6 गड्यांच्या मोबदल्यात 148 धावा केल्या. 149 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ 20 ओव्हरही खेळू शकला नाही. अफगाणिस्तानच्या गोलंदाजीपुढे ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी लोटांगण घातलं. अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियन संघाला 19.2 ओव्हरमध्ये 127 वर तंबूत धाडलं आणि हा सामना 21 धावांनी जिंकला.
प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानचे सलामीवर रेहमानुल्ला गुरबाज आणि इब्राहिम झारदान या दोघांनी तब्बल 118 धावांची पार्टनरशीप केली. 16 व्या ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाला गुरबाजच्या माध्यमातून पहिली विकेट मिळाली. गुरबाजने 49 बॉलमध्ये 60 धावा केल्या. मात्र पहिली विकेट पडल्यानंतर अफगाणिस्तानी फलंदाजींनी केवळ हजेरी लावल्याचं चित्र दिसलं. गुरबाजपाठोपाठ फलंदाजीसाठी आलेला ओमराझीही अवघे 3 बॉल खेळून तंबूत परतला. त्यानंतर सेट झालेला झारदानही आपलं अर्धशतक पूर्ण करुन तंबूत परतला.
कर्णधार राशीदलाही फलंदाजीमध्ये खास चमक दाखवता आली नाही. तो 5 बॉलमध्ये 2 धावा करुन तंबूत परतला. 118 वर बिनबादवरुन अफगाणिस्तानचा डाव 20 ओव्हरनंतर 8 बाद 148 पर्यंत गडगडला. म्हणजेच अफगाणिस्तानने 30 धावांमध्ये 8 गडी गमावले. ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक विकेट्स कर्णधार पॅट कमिन्सने घेतल्या. कमिन्सने 3 गडी बाद केले तर झॅम्पाने 2 गड्यांना तंबूचा रस्ता दाखवला. स्टॉनिसने एक विकेट घेतली.
नक्की पाहा >> Video: 'काय करतोय? तो आताच..', रोहितने कुलदीपला झापलं! Stump Mic मध्ये झालं रेकॉर्ड
ऑस्ट्रेलियन संघ 149 धावांच आव्हान सहज गाठेल असं वाटत होतं. मात्र अफगाणिस्तानी गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलियन फलंदाजी ठेपाळली. सामन्यातील तिसऱ्याच चेंडूवर सलामीवीर ट्रॅव्हीस हेड नवीन उल हकच्या गोलंदाजीवर क्लिन बोल्ड झाला. त्यानंतर स्कोअरबोर्डवर 16 धावा असताना वन डाऊन आलेला मिचेल मार्श तिसऱ्या ओव्हरमध्ये नवीन उल हकच्या गोलंदाजीवरच झेलबाद झाला. सहाव्या ओव्हरला संघाची धावसंख्या 32 वर असताना डेव्हिड वॉर्नरने विकेट फेकली. 11 व्या ओव्हरला स्टॉनिस तंबूत परतला. टीम डेव्हिडलाही या सामन्यात प्रभाव पाडता आला नाही. तो 4 बॉलमध्ये 2 धावा करुन एलबीडब्ल्यू झाला.
मॅक्सेवेलने एकट्याने अफगाणी गोलंदांजीचा समाचार घेतला. त्याने 41 बॉलमध्ये 59 धावा केल्या. 3 षटकार आणि 6 चौकार लगावून संघाची धावसंख्या 106 वर असताना मॅक्सवेल बाद झाला. त्यानंतर मॅथ्यू वेड लगेच तंबूत परतल्याने ऑस्ट्रेलियाची अवस्था 15.1 ओव्हरमध्ये 108 वर 7 बाद अशी झाली. कर्णधार पॅट कमिन्सही पुढच्याच ओव्हरला 111 धावसंख्या असताना तंबूत परतला. तळाचे दोन्ही फलंदाज या धावसंख्येत 16 धावांची भर घालून 127 च्या स्कोअरला डावातील 4 चेंडू बाकी असताना बाद झाले आणि अफगाणिस्तानने ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब केले.