T20 World Cup 2024 Bangladesh Cheating Video: अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये सुरु असलेल्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील 37 वा सामना बांगलादेश आणि नेपाळदरम्यान खेळवण्यात आला. मात्र या सामन्यातील एका घटनेनं नवीन वादाला तोंड फुटलं आहे. या सामन्यामध्ये बांगलादेशने चिडीचा डाव खेळल्याचा आरोप नेपाळच्या चाहत्यांकडून केला जात आहे. बांगलादेशचा जाकर अलीने केलेल्या कृतीमुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. बंगलादेशचा संघ फलंदाजी करत असताना तन्झीम हसन साकीबला बाद घोषित करण्यात आल्यानंतर डीआरएस घ्यावा की नाही यासाठी जाकर अली मैदानातूनच ड्रेसिंगरुमकडे पाहून सल्ला मागत असल्याचं समोर आलं आहे. ड्रेसिंगरुमकडून काही इशारा येतोय की नाही हे पाहून अगदी अकेरच्या क्षणी जाकरने तन्झीम हसन साकीबला डीआरएस घेण्याचा सल्ला दिला. तन्झीमला नेपाळी फिरकीपटू संदीप लामिछानेच्या गोलंदाजीवर एलबीडब्यू बाद घोषित करण्यात आलेलं.
सामन्यातील 14 व्या ओव्हरमध्ये हा सारा प्रकार घडला. लामिछानेने टाकलेला बॉल तन्झीमच्या पॅडला लागला आणि पंचांनी त्याला बाद घोषित केलं. त्यानंतर तन्झीम पव्हेलियनकडे जात असतानाच नॉन-स्ट्राइकर एण्डला असलेला जाकर अली बांगलादेशच्या ड्रेसिंग रुमकडे पाहत असल्याच कॅमेराने टीपलं.
बांगलादेशच्या ड्रेसिंग रुममधून इशाऱ्यांच्या माध्यमातून काहीतरी सांगण्यात आल्यानंतर जाकरने तन्झीमला हातवारे करुन डीआरएस रिव्ह्यू घेण्याचा सल्ला दिला. डीआरएससाठीचा वेळ संपण्याच्या अगदी काही सेकंद आधी तन्झीमने रिव्ह्यू घेतला. रिव्ह्यूमध्ये चेंडू लेग स्टम्पच्या बाहेरुन जात असल्याचं दिसलं. त्यामुळेच पंचांनी त्यांचा निर्णय मागे घेतला. मात्र तन्झीमला मिळालेलं हे जीवनदान फारसं प्रभावी ठरलं नाही. लामिछाने पुढल्याच चेंडूवर गुगलीच्या मदतीने 21 वर्षीय तन्झीमला तंबूचा रस्ता दाखवला.
सध्या सोशल मीडियावर यावरुन बरीच टीका होत असून अनेकांनी आयसीसीला टॅग करुन या गोष्टीकडे लक्ष वेधलं आहे. मैदानावरील खेळाडूने डीआरएस घ्यावा की नाही याचा निर्णय घेण्यासाठी ड्रेसिंग रुममधील एखाद्या व्यक्तीची मदत घेणे हे आयसीसीच्या नियमांनुसार चुकीचं आहे. याचाच संदर्भ देत आता सामन्यातील फोटो आणि या संपूर्ण प्रकाराचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. तुम्हीच पाहा हा व्हायरल व्हिडीओ...
1)
How does @ICC allow this? #Tanzim was out on LBW, and the non-striker Jaker went to the dressing room for help with the DRS call. The umpire didn’t know, and the third umpire was used even after the time limit! @T20WorldCup#t20iworldcup #BanVsNep #icct20iwc2024 #NepaliCricket pic.twitter.com/KffzMpDj5M
— Deepak Tharu (@deepaktharu_) June 17, 2024
2)
I came across a video showing blatant cheating by Bangladeshi batter Jaker.
Here are the details:
- In the 13.1 over, with Bangladesh at 69/7.
- Tanzim Hasan Shakib was given out LBW on Sandeep’s ball.
- The non-striker, Jaker, looked towards the dugout.
- Jaker waited for… pic.twitter.com/P1gEbIQB1v— Vipin Tiwari (@Vipintiwari952_) June 17, 2024
आता आयसीसी या प्रकरणात तन्झीम आणि बांगलादेशच्या संघाविरुद्ध काही कारवाई करते का हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.