भारत-पाकिस्तान सामन्याआधी मोठी बातमी, सामना लो-स्कोरिंग होणार... पिचबाबत आला रिपोर्ट

IND vs PAK, T20 World Cup 2024 : टी20 वर्ल्ड कपमधील सर्वात हायव्होल्टेज सामना आज रंगणार आहे. कट्टर प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान आज आमने सामने येणार आहत. न्यूयॉर्कच्या नासाऊ काऊंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडिअमवर हा सामना खेळवला जाणार आहे.  

राजीव कासले | Updated: Jun 9, 2024, 06:03 PM IST
भारत-पाकिस्तान सामन्याआधी मोठी बातमी, सामना लो-स्कोरिंग होणार... पिचबाबत आला रिपोर्ट title=

IND vs PAK, T20 World Cup 2024 : आयसीसी मेन्स् टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान  (India vs Pakistan) आमने येणार आहेत. न्यूयॉर्कच्या नासाऊ काऊंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडिअमवर ( Nassau (County International Cricket Stadium)  हा सामना खेळवला जाणार आहे. भारतीय  वेळेनुसार रात्री 8 वाजता सामन्याला सुरुवात होईल. भारतीय क्रिकेट संघाचं (Team India) नेतृत्व रोहित शर्माकडे (Rohit Sharma) आहे. तर बाबर आझमच्या (Babar Azam) खांदयावर पाकिस्तान क्रिकेट संघाची धुरा आहे. टी20 वर्ल्ड कपला हा सर्वात हायव्होल्टेज सामना असून जगभरातील करोडो क्रिकेट चाहत्यांचं लक्ष या सामन्याकडे लागलं आहे.

खेळपट्टीवरुन वाद
या सामन्याआधी न्यूयॉर्कच्या खेळपट्टीवरुन नवा वाद निर्माण झाला आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने इथल्या ड्रॉप-इन पिचवर प्रश्न उपस्थिते केला आहे. पिच क्युरेटरलाही या खेळपट्टीवर कशी कामगिरी होईल हे माहित नाही, भारतीय खेळाडूंना ड्रॉप-इन पिचचा फारसा अंदाज नाही असं रोहित शर्माने म्हटलं होतं. 

या खेळपट्टीवर होणार सामना
आता भारत-पाकिस्तान सामन्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार भारत-पाकिस्तानदरम्यानसाठी खेळपट्टी बदलली जाईल. आता हा सामना दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड सामना ज्या खेळपट्टीवर खेळवण्यात आला होता, त्याच खेळपट्टीवर भारत-पाक सामना रंगेल. पण दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड सामना या खेळपट्टीवर होऊन अद्याप 24 तासही उलटलेले नाहीत.

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नेदरलँडला अवघ्या 103 धावांत ऑळआऊट केलं होतं. पण विजयाचं आव्हान पार करताना दक्षिण आफ्रिकेलाही चांगलंच झुंजावं लागंले. दक्षिण आफ्रिकेने तब्बल सहा विकेट गमावले. डेव्हिड मिलरच्या नाबाद 59 खेळीमुळे दक्षिण आफ्रिकेला जेमतेम विजय मिळवता आला.

लो-स्कोरिंग खेळपट्टी
 नासाऊ काऊंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडिअमवर आतापर्यंत चार आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळवण्यात आले आहेत. या मैदानावर सर्वाधिक 137 ही धावसंख्या आहे. कॅनडा आणि आयर्लंडविरुद्धच्या या सामन्यात ही धावसंख्या नोंदवली गेली. 

खेळवपट्टीवर चेंडूची उसळी
भारत-आयर्लंड सामन्यादरम्यान खेळपट्टीवरुन टीका करण्यात आली होती. आयर्लंडच्या गोलंदाजीवेळी काही चेंडू अचानक उसळी घेत होते. तर काही वेळा चेंडू एकदम खाली राहात होता. भारताबरोबर आयर्लंडच्या फलंदाजांनाही याचा सामना करावा लागला. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि विकेटकिपर ऋषभ पंतच्या शरीरावर काही चेंडू आदळले. रोहित शर्मा अर्धशतक झाल्यानंतर रिटायर्ड झाला होता.

ड्रॉप-इन पिच म्हणजे काय?
नासाऊ काऊंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडिअमवर ड्रॉप-इन पिच  बसवण्यात आलं आहे. ड्रॉप-इन पिच  म्हणजे खेळपट्टी दुसऱ्या ठिकाणी तयारी केली जाते. त्यानंतर क्रेनने ती स्टेडिअमवर आणली जाते. या खेळपट्ट्या एडीलेड ओवल टर्फ सोल्यूशन्सच्या मार्गदर्शनाता बनवण्यात आल्यात. टी20 वर्ल्ड कप संपेपर्यंत  एडीलेड ओवल टर्फ सोल्यूशन्सची टीम न्यूयॉर्कमध्ये राहाणार आहे.