T20 World Cup 2022 : टी-20 विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानला (Pakistan) भारताकडून 4 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात दुबळ्या समजल्या जाणाऱ्या झिम्बॉम्बे (zimbabwe) संघाकडून 1 रनने पराभव झाला. आता पाकिस्तानी महिला खेळाडू कैनत इम्तियाजने एक ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी फक्त तीन शब्द सांगितले आहेत.
पाकिस्तानी महिला खेळाडू कैनत इम्तियाजने तिच्या ट्विटर अकाऊंटवरून लिहिले, 'व्हिज्युअलाइज, फोकस आणि एक्झिक्यूट. एका यूजरने यावर प्रतिक्रिया दिलीये की, तुम्ही बाबर आझम टीमला हे समजावून सांगा. त्याच वेळी, दुसऱ्या एका युजरने म्हटलं की, टीका करणे हा योग्य मार्ग आहे. एका चाहत्याने लिहिले की, सीमेपलीकडे जाण्याचा मार्ग कुठून आहे.?
Visualise ~ Focus ~ Execute !! pic.twitter.com/Wh9TGRkFuu
— Kainat Imtiaz (@kainatimtiaz16) October 28, 2022
2022 च्या टी-20 विश्वचषकात पाकिस्तानी संघ चांगली कामगिरी करू शकलेला नाही. यानंतर अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमवर जोरदार टीका केली आहे. टी-20 विश्वचषकात पाकिस्तानी फलंदाजी फ्लॉप ठरली. ओपनर्सच्या अपयशामुळे पाकिस्तानी फलंदाजीची क्रमवारी ढासळली आहे.
पाकिस्तानी संघाचे सलग दोन सामने गमवल्यानंतर आता त्यांची उपांत्य फेरी गाठण्याची शक्यता कमी झाली आहे. पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठण्यासाठी उर्वरित तीन सामने जिंकावे लागतील. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे 2-2 सामने पराभूत झाले तरच त्यांना सेमीफायनलपर्यंत जाता येणार आहे.