Gautam Gambhir on Virat Kohli : टी 20 वर्ल्डकपमधील (T20 World Cup 2022) ग्रुप स्टेजचे सामने सुरु असून पहिल्या दोन दिवसात मोठे उलटफेर पाहायला मिळाले. नामिबियाने श्रीलंकेला (Namibia Vs Sri Lanka) आणि स्कॉटलँडनं वेस्ट इंडिजला (Scotland Vs West Indies) पराभूत करत चुरस निर्माण केली आहे. टीम इंडिया (Team India) थेट सुपर 12 फेरीत आपला पहिला सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तान विरुद्ध (India Vs Pakistan) खेळणार आहे. हा सामना 23 ऑक्टोबरला खेळला जाणार आहे. सराव सामन्यात रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील भारतीय संघाने कांगारूंना त्यांच्याच भूमीत धूर चारली आहे. त्यामुळे टीम इंडियाचा आत्मविश्वास दुणावला आहे. तत्पूर्वी माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर (Gautam Gambhir) याच्या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे. सध्या फॉर्मात असलेल्या विराट कोहलीबाबत (Virat Kohli) गौतम गंभीरनं आपलं मत व्यक्त केलं आहे.
"फलंदाजाचं काम धावा करणं आणि गोलंदाजाचं काम विकेट घेणं आहे. अशात विराट कोहलीसारखे फलंदाज याच माइंडसेटने टी 20 वर्ल्डकप स्पर्धेत उतरणार आहेत. विराट कोहलीने फक्त धावा करण्यावर लक्ष केंद्रीत केलं पाहीजे. विक्रम प्रस्थापित करणं किंवा तोडण्यावर नाही.", असं गौतम गंभीरनं सांगितलं.
Gautam Gambhir on Virat Kohli in the pre show on Star sports.#GautamGambhir #ViratKohli pic.twitter.com/XEdgUVfN9G
— Rahul Choudhary (@Thefunone07) October 17, 2022
IND vs AUS: विराट कोहलीच्या 'रॉकेट थ्रो'मुळे टिम डेविड थेट तंबूत, Video Viral
"50 धावा करा नाहीतर 100 पण संघाची धावसंख्या 170/180 पर्यंत पोहोचली पाहीजे. जेव्हा विजयी धावांचा पाठलाग करता तेव्हा मधल्या फळीच्या फलंदाजांवरील दबाव कमी होतो. मोठ्या स्पर्धेत वैयक्तिक विक्रम बाजूला ठेवायला हवेत. यासाठी देशाचा विचार करणं गरजेचं आहे. वर्ल्डकप जिंकण्याची महत्त्व आहे. त्यामुळे वैयक्तिक चांगल्या धावा करून टीम उपांत्य फेरीत पोहोचली नाही तर त्याचा काही उपयोग नाही.", असंही गौतम गंभीरनं पुढे सांगितलं.