Ind VS Ban : शाकिबच्या वक्तव्यावर राहुल द्रविडला हसू अनावर; दिलेल्या उत्तराने जिंकले मन

आम्ही वर्ल्डकप जिंकण्यासाठी आलो नाही असे शाकिब म्हणाला होता

Updated: Nov 2, 2022, 01:54 PM IST
Ind VS Ban : शाकिबच्या वक्तव्यावर राहुल द्रविडला हसू अनावर; दिलेल्या उत्तराने जिंकले मन title=

Ind vs Ban : आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 मध्ये (ICC T20 World Cup)बुधवारी भारताचा सामना बांगलादेशविरुद्ध (ind vs ban) होत आहे. याआधी बांगलादेशचा (bangladesh) कर्णधार शाकिब अल हसन (shakib al hasan) याने अजब विधान केले होते. आम्ही येथे विश्वचषक जिंकण्यासाठी आलो नाही आणि भारतीय संघ (Team India) विश्वचषक (Worldcup) जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार आहे. त्यामुळे आम्ही त्यांना हरवले तर मोठा बदल होईल, असे शाकिबने म्हटलं होतं. शाकिबने आपल्या युवा संघाला भारताची ताकद विसरून काहीही न गमावण्याच्या मानसिकतेने खेळण्याचे आवाहन केले होते. या विधानावरुन शाकिबची खिल्लीही उडवण्यात आली होती. त्याचवेळी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (rahul dravid) यांना याबाबत विचारले असता त्यांनाही हसू आवरता आले नाही. (Rahul Dravid laughs at shakib al hasan statement then give answer)

सामन्याच्या एक दिवस आधी पत्रकार परिषदेत राहुल द्रविड (rahul dravid) यांना जेव्हा हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ते आधी हसले आणि नंतर या प्रश्नावर उत्तर दिले. "जिंकण्यासाठी आम्हाला चांगला खेळ करावा लागेल. मला वाटते की आम्ही त्यांचा खूप आदर करतो. आम्हालाही वाटते की तो खूप चांगला संघ आहे. मला वाटते की या विश्वचषकाने आम्हाला हे शिकवले आहे की टी-20 फॉरमॅटमध्ये (T20) तुम्ही कोणत्याही संघाला हलक्यात घेऊ शकत नाही. जसे आयर्लंडने इंग्लंडला हरवले आहे," असे राहुल द्रविड म्हणाले.

"टी-20 फॉरमॅट हा खूपच छोटा फॉरमॅट आहे. काहीवेळा विजय-पराजयाचे अंतर 12-15 धावांचे असते, आणि जर तुम्ही पाहिल्यास, दोन चेंडूंवर मोठे फटके मारण्याचीच गोष्ट आहे," असेही द्रविड पुढे म्हणाले.  

"आम्ही चांगली सुरुवात करत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध लढत दिली. आमच्याकडूनही काही चुका झाल्या आहेत. टी-20 क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकते, पाकिस्तानचा सामनाही कोणत्याही बाजूने जाऊ शकला असता," असे राहुल द्रविड म्हणाले.