मुंबई: टी 20 वर्ल्ड कपसाठी 15 खेळाडूंची टीम आधीच जाहीर झाली आहे. आयपीएल दरम्यान खेळाडूंच्या खराब कामगिरीमुळे आता टीम इंडियात सिलेक्ट झालेल्या खेळाडूंपैकी काहींना धोका आहे. टीम इंडियात फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. टी 20 वर्ल्ड कपसाठी 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्यात अनेक खेळाडूंच्या खराब कामगिरीमुळे BCCI अडचणीत आले आहे.
हे पाहता शनिवार 9 ऑक्टोबर रोजी मंडळाची बैठक होणार आहे. या बैठकी दरम्यान काही बदलांचा प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे. या बदलांवर विचार करण्यात येईल आणि त्यानंतर ते बदल होतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा, प्रशिक्षक रवी शास्त्री, बोर्ड सचिव जय शाह आणि मुख्य निवडकर्ता चेतन शर्मा
या बैठकीला उपस्थित असल्याची माहिती आहे. आयसीसीच्या नियमांनुसार संघ 10 ऑक्टोबरपर्यंत बदल करू शकतात. इनसाइड स्पोर्ट्सने दिलेल्या वृत्तानुसार 9 तारखेला होणाऱ्या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय होऊ शकतात. यामध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा संघासाठी कोणते बदल करता येतील याबाबत बैठकीत प्रस्ताव ठेवतील. श्रेयस अय्यला संघात संधी दिली जाण्याची शक्यता आहे. सूर्यकुमार यादव देखील चांगल्या फॉर्ममध्ये नाहीय. त्यामुळे त्याची टीम इंडियातील जागा देखील धोक्यात आहे.
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), के एल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, राहुल चाहर, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी.
स्टँडबाय प्लेअर्स- श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकुर आणि दीपक चाहर