मुंबई : अंडर 19 क्रिकेट वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची निवड झाली आहे. 2018 मध्ये अंडर 19 वर्ल्डकप होणार आहे.
मुंबईचा पृथ्वी शॉ याची भारतीय संघाचा कर्णधार म्हणून निवड झाली. भारतीय क्रिकेट बोर्डाचे कार्यकारी सचिव अमिताभ चौधरी यांनी रविवारी याची घोषणा केली.
16 देशांमध्ये होणारा वर्ल्डकप 2018 हा यंदा न्यूझीलंडमध्ये असणार आहे. 13 जानेवारी ते 3 फेब्रुवारी 2018 दरम्यान न्यूझीलंडमध्ये ही टुर्नामेंट रंगणार आहे.
गेल्या वर्षीच्या उपविजेत्या भारतीय संघाने 2000, 2008 आणि 2012 मध्ये हा किताब जिंकला आहे. गेल्या वर्षी बांगलादेशमध्ये झालेल्या विश्वकपमध्ये भारतीय संघाचा वेस्ट इंडिजकडून पराभव झाला होता. भारताव्यतिरिक्त, ऑस्ट्रेलिया (1988, 2002, 2010) यांनी देखील तीन वेळा वर्ल्डकप जिंकला आहे.
भारताचा अंडर 19 संघ : पृथ्वी शॉ (कर्णधार), शुभम गिल (उपकर्णधार), मंजोत कालरा, हिमांशु राणा, अभिषेक शर्मा, ऋयान पराग, आर्यन जुयाल (विकेट कीपर), हार्विक देसाई (विकेट कीपर), शिवम मावी, कमलेश नागरकोटी, इशान पॉरेल, अर्शदीप सिंह, अनूकुल रॉय, शिवा सिंह, पंकज यादव.
राखीव : ओम भोसले, राहुल चहर, निनाद राथवा, उर्विल पटेल आणि आदित्य ठाकरे