close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

हॉकी चॅम्पियनशिप: भारताचा पाकिस्तानवर 4-0 ने दणदणीत विजय

भारताची पाकिस्तानवर मात

Updated: Jun 23, 2018, 08:01 PM IST
हॉकी चॅम्पियनशिप: भारताचा पाकिस्तानवर 4-0 ने दणदणीत विजय

मुंबई : नेदरलँड येथे सुरु असलेल्या हॉकी चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय हॉकी संघानं पारंपरिक स्पर्धक पाकिस्तान संघावर दणदणीत विजय मिळवला आहे. भारतानं पाकिस्तानचा ४-०नं धुव्वा उजवत स्पर्धेत विजयी सलामी दिली. रमणदिप सिंगनं २५व्या मिनिटाला पहिला गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दोन्ही संघ गोल करण्यासाठी झगडताना दिसले. 54व्या मिनिटांला दिलप्रित सिंगनं दुसरा गोल करत भारताची आघाडी वाढवली. त्यानंतर मनदीप सिंगनं 57व्या मिनिटाला तिसरा गोल झळकावत आघाडी आणखी वाढवली. 60व्या मिनिटाला रमणदीप सिंगनं भारतातर्फे दुसरा गोल झळकावत भारताला विजय मिळवून दिला.

भारताचे स्ट्रायकर्स पाकिस्तानवर हल्ले चढवत असताना डिफेडर्सनीही तोडीस तोड कामगिरी करत पाकिस्तानचे सर्व हल्ले परतवले. पुढच्या फेरीत भारताचा सामना ऑलिंपिक सुवर्णपदक विजेत्या अर्जेंटीनाशी होणार आहे.