IND vs WI 3rd T20 : अखेर टीम इंडियाचा सूर्य तळपला! मालिकेत राखली लाज, वेस्ट इंडिजवर 7 गडी राखून विजय

India beat West Indies In 3rd T20I : वेस्ट इंडिजने दिलेल्या 160 धावांच आव्हान पार करताना टीम इंडियाने हा सामना 7 गडी राखून जिंकला आहे. त्यामुळे आता भारताने सिरीजमध्ये 2-1 ने कमबॅक केलंय. 

Updated: Aug 8, 2023, 11:16 PM IST
IND vs WI 3rd T20 : अखेर टीम इंडियाचा सूर्य तळपला! मालिकेत राखली लाज, वेस्ट इंडिजवर 7 गडी राखून विजय title=
india beat West Indies by 7 wickets in 3rd T20

West Indies Vs India 3rd T20: सध्या वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यात खेळवल्या जात असलेल्या पाच टी-ट्वेंटी सामन्याच्या सिरीजमधील तिसऱ्या सामन्यात (IND vs WI 3rd T20) टीम इंडियाने दणदणीत विजय मिळवला आहे. या सामन्यात टीम इंडियाचा सूर्य तळपल्याचं पहायला मिळालं. तर तिलक वर्मा दमदार फलंदाजी आणि कुलदीप यादवच्या फिरकीच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिजचा धुरळा उडवला. 160 धावांच आव्हान पार करताना टीम इंडियाने हा सामना 7 गडी राखून जिंकला आहे. त्यामुळे आता भारताने सिरीजमध्ये 2-1 ने कमबॅक केलंय. 

वेस्ट इंडिजने दिलेल्या 160 धावांचं आव्हान पार करताना टीम इंडियाची सुरूवात चांगली झाली नाही. यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल सपशेल फेल ठरले. डेब्यू सामन्यात यशस्वी जयस्वालला फक्त 1 रन करता आला. तर शुभमनचा फॉर्म पुन्हा एकदा डगमलेला दिसून आला. त्याने केवळ 6 रन्स केले. दोन्ही खेळाडू बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी टीम इंडियाला विजयाच्या उंभरठ्यावर नेऊन ठेवलं. सूर्यकुमार यादवने आज दमदार खेळी करत 83 धावा केल्या. केवळ 44 बॉलमध्ये सूर्याने मैदान मारलं. या इनिंगमध्ये सूर्याने 10 फोर आणि 4 सिक्स खेचले. सूर्या बाद झाल्यानंतर हार्दिक आणि तिलक वर्माने कार्यक्रम संपवला. 

आणखी वाचा - 'धोनी चांगला कॅप्टन होता, पण...' युवराज सिंहने टीम इंडियाला दाखवला आरसा, म्हणतो 'वर्ल्ड कप जिंकायचा असेल तर...'

प्रथम टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय वेस्ट इंडिजने घेतला होता. कॅप्टनचा निर्णय दोन्ही सलामीवीरांनी योग्य ठरवला. ब्रँडन किंग आणि काइल मेयर्स यांनी दणक्यात सुरूवात केली. 7 ओव्हरमध्ये 55 धावांचं योगदान त्यांनी दिलं. त्यानंतर जॉन्सन चार्ल्स आणि निकोलस पूरन यांना मोठी खेळी करता आली नाही.  ब्रँडन किंगने सर्वाधिक 42 धावा केल्या. तर कॅप्टन रोव्हमन पॉवेलने 19 बॉलमध्ये 40 धावांची वादळी खेळी केली. यामध्ये त्याने 3 सिक्स खेचले. भारताकडून कुलदीप यादवने 4 ओव्हरमध्ये 28 धावा देत 3 महत्त्वाच्या विकेट्स काढल्या. त्याचबरोबर अक्षर आणि मुकेश कुमारला 1-1 विकेट मिळाली. वेस्ट इंडिजने 159 धावा करत 160 धावांचं आव्हान भारताला दिलं.

 

पाहा प्लेइंग इलेव्हन

भारत (प्लेइंग इलेव्हन): शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, हार्दिक पंड्या (C), संजू सॅमसन (WC), अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल, मुकेश कुमार.

वेस्ट इंडीज (प्लेइंग इलेव्हन): ब्रँडन किंग, काइल मेयर्स, जॉन्सन चार्ल्स, निकोलस पूरन (WC), रोव्हमन पॉवेल (C), शिमरॉन हेटमायर, रोमॅरियो शेफर्ड, रोस्टन चेस, अकेल होसेन, अल्झारी जोसेफ, ओबेद मॅककॉय.