जोहान्सबर्ग : टीम इंडिया सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. यावेळी पहिली टेस्ट जिंकून 3 सामन्याच्या कसोटी सीरीजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता सीरीजमधील दुसरी कसोटी 3 जानेवारीपासून जोहान्सबर्गमध्ये खेळवली जाणार आहे. जर टीम इंडियाने हा सामना जिंकला तर इतिहासात प्रथमच दक्षिण आफ्रिका त्यांच्या घरच्या मैदानावर कसोटी सीरीज जिंकेल.
जोहान्सबर्ग कसोटीसाठी टीम इंडियाच्या प्लेइंग-11 मध्ये दोन मोठे बदल होण्याची शक्यता आहे. हे बदल फलंदाजीत नव्हे तर बोलिंगमध्ये होण्याची शक्यता आहे. या कसोटीत चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेला अधिक संधी मॅनेजनमेंट देण्याची शक्यता आहे.
टीम मॅनेजमेंट दुसऱ्या कसोटीसाठी वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरच्या जागी उमेश यादवला संधी मिळण्याची शक्यता आहे. पहिल्या सामन्यात त्याला विशेष कामगिरी करता आली नाही. जोहान्सबर्गच्या खेळपट्टीवर अधिक गवत असण्याची अपेक्षा असून पावसामुळे वेगवान गोलंदाजांसाठी हवामान उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे टीम इंडिया 4 फास्ट गोलंदाजांसह मैदानात उतरणार?
दुसरी बदल हा स्पिनर्समध्ये होऊ शकतो. यावेळी अश्विनला बसवून हनुमा विहारीला टीममध्ये स्थान देण्याची शक्यता अधिक आहे. हनुमाने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर इंडिया ए टीमसाठी चांगले रन्स केले होते.
केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन/हनुमा विहारी, शार्दूल ठाकुर/ मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह और मोहम्मद सिराज.