विश्वचषक पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माची पहिली पोस्ट, सोशल मीडियावर व्हायरल

Team India: आयसीसी विश्वचषकात सलग दहा विजय मिळवणाऱ्या टीम इंडियाला अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव पत्करावा लागला. या पराभावर अनेक खेळाडूंनी प्रतिक्रिया दिली होती. आता कर्णधार रोहित शर्माने सोशल मीडियावर पहिली पोस्ट केली असून ती व्हायरल झाली आहे. 

राजीव कासले | Updated: Nov 27, 2023, 03:33 PM IST
विश्वचषक पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माची पहिली पोस्ट, सोशल मीडियावर व्हायरल title=

Rohit Sharma Instagram Story: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने (Team India) विश्वचषक 2023 स्पर्धेत अविस्मरणीय कामगिरी करत लीगमध्ये सलग नऊ आणि सेमीफायनल असे दहा सामने जिंकत अंतिम सामन्यात धडक मारली. पण अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर सहा विकेट्सने मात केली आणि भारताचं तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न अपूर्णच राहिलं. या पराभवामुळे करोडो भारतीय क्रिकेट चाहत्यांची मोठी निराशा झाली. इतकंच काय तर मैदानात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा, मोहम्मद सिराज यांच्या डोळ्यातही अश्रू तरळले. अनेक खेळाडूंनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. आता टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) पहिल्यांदा सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. 

रोहित शर्माची इन्स्टा पोस्ट
रोहित शर्माने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर (Instagram Account) एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत रोहित पत्नी रितिकाबरोबर दिसत आहे. या फोटोतलं लोकेशन परदेशातलं दिसतंय. फोटोवरुन रोहित शर्मा आपल्या कुटुंबासह परदेशात सुट्टी एन्जॉय करतोय हे दिसतंय. रोहित शर्मा आणि टीम इंडियातल्या इतर दिग्गज खेळाडूंना सततच्या व्यस्त वेळापत्रकातून विश्रांती देण्यात आली आहे. 

विश्वचषकात दमदार कामगिरी
टीम इंडियाला विश्वचषक पटकावता आला नसला तरी या स्पर्धेत टीम इंडियाच्या अनेक खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. रोहित शर्मा विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला. पहिल्य क्रमांकावर भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली होती. विराटने 11 सामन्यात 765 धावा केल्या. तर रोहित शर्माने 11 सामन्यात 125.95 च्या स्ट्राइक रेटने  597 धावा केल्या. यात त्याने तब्बल 66 चौकार आणि 31 षटकारांची बरसात केली. तर 11 सामन्यात रोहितच्या नावावर 3 अर्धशतकं आणि 1 शतक जमा आहे. रोहित शर्माने या स्पर्धेत अनेक विक्रम रचले. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माने सर्वाधिक षटकार लगावत क्रिक गेलला विक्रम मोडला. 

विश्वचषक हरण्याचं दु:ख
2011  विजयानंतर टीम इंडिया तीन विश्वचषक स्पर्धा खेळली,पण यात जेतेपद मिळवता आलं नाही. शेवटचं भारताने 2013 मध्ये चॅम्पियन ट्रॉफी जिंकली होती. पण त्यानंतर टीम इंडियाला एकाही आयसीसी स्पर्धेचं जेतेपद पटकावता आलेलं नाही. आता टीम इंडियाची नजर 2024 मध्ये होणाऱ्या टी20 विश्वचषकावर असणार आहे, त्या दृष्टीने तयारीसुद्ध सुरु केली आहे. वेस्टइंडिज आणि अमरिकेत टी20 विश्वचषक स्पर्धआ खेळवली जाणार आहे.