हिमाचल प्रदेश : भारत श्रीलंका यांच्यात खेळविला गेलेल्या पहिल्या वनडेत भारताची कामगिरी निराशाजनक राहिली. भारताकडून धोनी व्यतिरिक्त कोणीही बॅट्समन मैदानात टीकू शकले नाही.
एका क्षणी असे वाटले की भारत सर्वात कमी स्कोअर बनवेल. पण तेव्हा धोनी मैदानात आला आणि त्याने डाव सावरला. एवढच नव्हे तर त्याने मैदानात महत्त्वाचे निर्णयही घेतले.
३३ वी ओव्हर सुरू होती. त्या दरम्यान मैदानात आलेला ऑलराऊंडर जसप्रीत बुमराह धोनीला चांगली साथ देत होता. पण एक बॉल बुमराहच्या बॅडवर जाऊन आदळला आणि लंकन खेळाडूंनी जोरदार अपील केले.
अम्पायर अनिल चौधरींनी बुमराहला आऊट दिले. बुमराहदेखील पॅवेलिअनमध्ये जाण्यासाठी निघाला. पण अम्पायरचे बोट उठण्याआधीच धोनीने डीआरएस घेण्याचा इशारा केला.
थर्ड अम्पायरला रेफर केल्यानंतर निर्णय भारताच्या बाजूने लागला. मैदानातील फॅन्स आनंदी होत जोरजोराने ओरडू लागले. 'धोनी रिव्ह्यू सिस्टिम' खरी ठरते हे धोनीने दाखवून दिले.
धोनीने भारताला १०० रन्सच्या पुढे नेले. मॅच जरी हरलो तरीही त्याच्या टीकाकारांना धोनीने सणसणीत उत्तर दिले. मैदानातील बॉस आपणच आहोत हे धोनीने पुन्हा दाखवून दिले.