इंदूर : टीम इंडियाने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत करून इंदूरच्या स्टेडियमवर 7 नवे रेकॉर्ड प्रस्थापित केले. वनडे मालिका आपल्या नावावर करत टीम इंडियाने अनेक रेकॉर्ड मोडले.
१. टीम इंडियाच्या सलामीवीर रोहित शर्माने रविवारी खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात 62 चेंडूंत 71 धावा केल्या. या डावात त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक नवीन विक्रम बनवला. ऑस्ट्रेलिया विरुद्ध 63 सिक्स मारणारा तो बॅट्समन बनला आहे. हिटमॅन म्हणून ओळखला जाणाऱ्या रोहितने न्यूझीलंडच्या ब्रॅंडन मॅक्कुलमचा 61 सिक्सचा रेकॉर्ड मोडला आहे. रोहितने या सामन्यात त्याच्या करिअरमधला सर्वात जलद 42 चेंडूत अर्धशतक साकारले. 2013 नंतर रोहितने 113 सिक्स लगावले आहे. तर एबी डिविलिअर्सने 106, आयन मॉर्गन 100, मार्टिन गुप्टिल 96, जोस बटलर आणि कोहलीने 74 तर धोनीने 70 सिक्स लगावले आहेत.
२. भारताने ऑस्ट्रेलियाला 3-0 ने पराभूत करून पाच सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ही पहिलीच वेळ आहे की भारताने कांगारू संघाविरुद्ध दोन मालिका शिल्लक असतांनाच मालिका जिंकली आहे.
३. हार्दिक पंड्या पुन्हा एकदा त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे सामनावीर बनला आणि कोहलीने त्याला टीम इंडियाचा नवा तारा घोषित केला आहे. तो गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीमध्ये अद्भुत कामगिरी करू शकतो. या पराभवामुळे ऑस्ट्रेलियाने परदेशात शेवटच्या 13 सामन्यांपैकी एकदिवसीय सामन्यात एकही विजय मिळवला नाही. हा एक वेगळा विक्रम बनला आहे.
४. कोहलीने एकदिवसीय सामन्यांत 9वा विजय मिळवत धोनीच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे. 14 नोव्हेंबर 2008 पासून 5 फेब्रुवारी 2009 दरम्यान माही कर्णधार असतांना भारताने सलग 9 एकदिवसीय सामने जिंकले आणि जुलैपासून कर्णधार कोहली आतापर्यंत 9 सामने जिंकले. मालिका जिंकल्यानंतर टीम इंडियाने सलग सहा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने जिंकले आहेत. 2007 मध्ये राहुल द्रविड कर्णधार असतांना, 2007 ते 09 धोनी कर्णधार असतांना आणि त्यानंतर धोनी आणि विराट संयुक्त कर्णधार असतांना भारतीय संघाने 6 एकदिवसीय मालिका जिंकली आहे.
५. पहिल्या 38 एकदिवसीय लढतीमध्ये रिकी पाँटिंगने 31 सामने जिंकले. कोहलीने 30 सामने जिंकत क्लाइव्ह लॉड आणि विव्ह रिचर्ड्सची बरोबरी केली. दक्षिण आफ्रिकेचा हन्सी क्रोनी आणि ऑस्ट्रेलियाचा मायकेल क्लार्कने 28 सामने तर वकार युनूसने 27 सामने जिंकले होते.
६. रविवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात आणखी एक उत्तम रेकॉर्ड बनला. लेग-ब्रेक गोलंदाज युजवेंद्र चहलने तीन वेळा ग्लेन मॅक्सवेलला गेल्या तीन सामन्यांत आपल्या फिरकीने मैदाना बाहेर केले. चेन्नईमध्ये मनीष पांडेच्या हातात तो कॅस देऊन बसला तर दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात धोनीने त्याला स्टम्पिंग केलं.
७. टीम इंडियासाठी फक्त काहीच असे मैदान आहेत जे त्यांच्यासाठी लकी ठरतात. इंदूर हे त्यांपैकीच एक आहे, जिथे टीम इंडियाने आतापर्यंतचे सर्व सामने जिंकले आहेत. गेल्या 10 वर्षांमध्ये (2007-17) भारताने सलग सहा एकदिवसीय सामने जिंकले आहेत. इंदूरच्या होळकर स्टेडियमवर गेल्या 11 वर्षांत (2006-17), टीम इंडियाला कोणीही पराभूत करु शकले नाही.