केएल राहुलच्या खेळीमुळे धोनीच नाही, आणखी २ खेळाडू टीम बाहेर राहू शकतात

टीम इंडियात केएल राहूल सध्या फॉर्मात आहे. राहूलच्या यशस्वी खेळीवर बीसीसीआयचे अध्यक्ष आणि टीम इंडियाचा माजी कप्तान

Updated: Jan 28, 2020, 09:45 PM IST
केएल राहुलच्या खेळीमुळे धोनीच नाही, आणखी २ खेळाडू टीम बाहेर राहू शकतात title=

मुंबई : टीम इंडियात केएल राहूल सध्या फॉर्मात आहे. राहूलच्या यशस्वी खेळीवर बीसीसीआयचे अध्यक्ष आणि टीम इंडियाचा माजी कप्तान सौरव गांगुली देखील खुश आहे. स्वत: कॅप्टन असताना सौरव गांगुलीने या जागेवरची भूमिका राहुल द्रविडकडून पार पाडली आहे. कारण २००३ मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या आयसीसी वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेत टीम इंडियाचा कॅप्टन सौरव गांगुली होता आणि विकेटकीपिंगची जबाबदारी होती राहुल द्रविडकडे.

हाच केएल राहूल आता माजी कप्तान एमएस धोनीसाठी टीम इंडियात येण्यास अडथळा ठरू शकतो. धोनीला टीम इंडियात परतायचं असेल, तर त्याला आयपीएलमध्ये चमकदार खेळी करावी लागेल.

धोनीसाठी आता आयपीएल हा एकमेव टीम इंडियाचा बुरूज पुन्हा एकदा सर करण्यासाठी परतीचा दोर राहिलेला आहे.

विराट कोहलीने तर राहुल फॉर्ममध्ये आहे, तर त्याच्या कडूनच विकेटकीपिंग करून का घेऊ नये, यावर जोर दिला आहे.

धोनीचं नाही, तर केएल राहुलने ऋषभ पंत, संजू सॅमसन यांची देखील विकेटकीपर म्हणून टीम इंडियात येणे अडथळ्यांची शर्यत पार करण्यासारखी परिस्थिती निर्माण केली आहे.

केएल राहुल त्याच्या विकेटकिंपिंगवर मनातल्या मनात खुश आहे. केएल राहुलला आयपीएलच्या मैदानात एक सलामीचा डाव खेळताना आलेला अनुभव कामी आला.

विकेटकिंपिंगचा अनुभव केएल राहुल सर्वांना सांगतो. त्याचं निरीक्षणही दमदार म्हणावं लागेल. केएल राहुल बॉलर्सना हे देखील सांगतो, विकेट कशी आहे, कोणत्या लाईन आणि लेंग्थनुसार बॉलिंग केली पाहिजे.

यामुळे टीम इंडियाच्या कॅप्टनलाही फिल्डिंग कशी लावावी यात अधिक स्पष्टता येते. केएल म्हणतो २० ओव्हर्सच्या मॅचमध्ये कशी खेळी करावी हे देखील यातून शिकता येतं.

आता जर विकेटकीपिंग करण्याच्या बाबतीत कप्तान विराट कोहलीला आणखी एक उमदा खेळाडू टीममध्ये सामिल करण्याची संधी मिळत असेल, तर विकेटकीपर ऋषभ पंत आणि संजू सॅमसनसाठी हा धोक्याचा इशारा आहे.

जर केएल राहुलची यशस्वी घौडदौड अशीच सुरू राहिली, तर ऋषभ पंत आणि संजू सॅमसनसाठी यावर्षी ऑस्ट्रेलिया होणारी आयसीसी टी-20 वर्ल्ड कप खेळण्याचं स्वप्न पूर्ण होणे अशक्य होत जाणार आहे.