विशाखापट्टणम : भारत आणि ऑस्ट्रेलियातील टी-२० सीरिजला आजपासून सुरुवात होत आहे. पहिली टी-२० मॅच आज भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता विशाखापट्टणम येथे खेळली जाणार आहे. या मॅच आधी भारतीय टीमने जोरदार सराव केला आहे. आगामी वर्ल्डकपच्या दृष्टीने ही ऑस्ट्रेलिया विरुद्धची सीरिज मह्त्वपूर्ण समजली जात आहे.
Depart
Arrive
Train & sweat it out #TeamIndia gear up for the 1st T20I in Vizag #INDvAUS pic.twitter.com/Qv5tbFTQpw— BCCI (@BCCI) 22 February 2019
मैदानात कॅप्टन विराट कोहली सोबत ऊमेश यादव सराव करताना दिसत आहेत. यासोबतच महेंद्र सिहं धोनी देखील नेट मध्ये सराव करत आहे. धोनीचा सराव करतानाचा व्हिडिओ बीसीसीआयने ट्विटरवरुन शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये धोनीचा मोठे फटके मारण्यावर भर देत येत आहे. नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यावर धोनीने सातत्यापूर्ण कामगिरी केली. तसेच स्टंपमागून देखील त्याने आपली हुशारी दाखवत विरोधी संघाच्या बॅट्समनना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. धोनीच्या कामगिरीवर अनेकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केल होते. धोनीने या टीकाकारांना आपल्या खेळीने चोख प्रत्युतर दिले होते.
Belting it at the nets @msdhoni #TeamIndia @Paytm #INDvAUS pic.twitter.com/hRDZUE5MvX
— BCCI (@BCCI) 23 February 2019
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या या टी-२०सीरिजसाठी कुलदीप यादवला विश्रांती देण्यात आली आहे. भारतीय टीम ऑस्ट्रेलिया सोबत २ टी-२० मॅच खेळणार आहे. एका कार्यक्रमात महिलांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्यानंतर बंदी उठवल्यानंतर के.एल. राहुल पहिल्यांदाच खेळणार आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया आतापर्यंत १७ टी-२० मॅच खेळले आहेत. यातून ११ मॅचमध्ये भारतीय टीमने विजय मिळवला आहे. तर ऑस्ट्रेलियाला फक्त ६ मॅचमध्येच विजय मिळवता आला आहे. त्यामुळे या आकडेवारीनुसार भारतीय टीम वरचढ असल्याचे दिसून येत आहे.
टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, शिखर धवन, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, एमएस धोनी (कीपर), हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, विजय शंकर, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, सिद्दार्थ कौल आणि मयांक मार्केंड्य.